शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका काळे यांना अटक करा, पोलीस उपायुक्त कार्यालयावर काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:59 IST

कल्याण : आमदार निधीतून झालेल्या विकासकामांच्या श्रेयाच्या बॅनरवरून १६ आॅक्टोबरला शिवसेना नगरसेवक माधुरी काळे आणि शीतल मंढारी यांच्यात हाणामारी झाली होती.

कल्याण : आमदार निधीतून झालेल्या विकासकामांच्या श्रेयाच्या बॅनरवरून १६ आॅक्टोबरला शिवसेना नगरसेवक माधुरी काळे आणि शीतल मंढारी यांच्यात हाणामारी झाली होती. याप्रकरणी मंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्हा दाखल होऊनही काळे यांना कोळसेवाडी पोलीस अटक करीत नसल्याने आदिवासी विकास परिषदेने पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.कल्याण पूर्वेतील विजयनगर पोलिस चौकीपासून आदिवासी विकास परिषदेने काढलेल्या मोर्चात नगरसेविका मंढारी, प्रकाश पंडित, भारत सोनवणे, सुमित हुमणे, संजय केदारे आदी कार्यकर्ते सहभागी झालेले होते. पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांची परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी काळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आठ दिवस उलटून गेले तरी काळे यांना अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासांत आरोपीला अटक होणे आवश्यक आहे. तशी कायद्यात तरतूद आहे. तरीही पोलीस काळे यांना अटक करण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप केला आहे. शिंदे म्हणाले, की काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुरावे गोळा करून त्यांच्या अटकेचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, चार दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन उपायुक्तांनी दिले असल्याची माहिती हुमणे यांनी दिली.नगरसेविका काळे यांनी सांगितले की, नगरसेविका मंढारी यांच्या तक्रारीच्या आधारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याठिकाणी मी कोणत्याही प्रकारे जातीवाचक शब्द वापरलेला नाही. त्यामुळे खोटी तक्रार देणाºया मंढारी यांचीच चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.>केवळ बदनामीसाठी गुन्हाभारतीय मराठी सेवा प्रतिष्ठानचे प्रदेश कार्याध्यक्ष अरविंद मोरे यांनी सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काळे या मराठा समाजाच्या आहेत. ९७ टक्के बोगस केस मराठा समाजाविरोधात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंढारी यांच्या तक्रारीद्वारे काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा समाजाच्या नगरसेविकेला बदनाम करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.