शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेना स्वबळावर लढणार, युती करण्यास वरिष्ठांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:19 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असणारी शिवसेना आगामी पालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातून लढण्यास उत्सुक होती.

पंकज पाटील बदलापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असणारी शिवसेना आगामी पालिका निवडणुकीतही युतीच्या माध्यमातून लढण्यास उत्सुक होती. त्यासंदर्भात आमदार किसन कथोरे यांनीही अनुकूलता दर्शवली होती. मात्र, राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा फटका हा बदलापूरमध्ये युतीलाही बसणार आहे. स्थानिक नेत्यांनी युतीबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांकडे शब्द टाकल्यावर त्यांना युतीबाबत स्पष्ट नकार असल्याचे सांगण्यात आले आहे.बदलापूर पालिकेच्या राजकीय वर्तुळात केवळ युतीचीच चर्चा आहे. गेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आपली ताकद आजमावली होती. यंदा विधानसभा निवडणुकीत युतीमधील दुरावा कमी झाला होता. त्यामुळे बदलापूरमधील शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती करण्याचा प्रस्ताव होता.यासंदर्भातील प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठांनी युतीबाबत अनुकूलता दर्शवली नाही. अप्रत्यक्षपणे युतीला नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जे दोन पक्ष एकत्रित निवडणूक लढविणार होते तेच दोन पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. बदलापूरमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष हा दोन्ही पक्षांपैकी एका पक्षासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.>युतीची शाश्वती कुणीच देत नाहीराष्ट्रवादीने सुरुवातीला स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, आता राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांनी भाजपाकडेही बोलणी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत कोणत्या पक्षाची युती होणार, याची शाश्वती कोणीच देताना दिसत नाही.