शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामप्रकरणी सेना नगरसेवकांचा संताप; कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:56 IST

२०० खोल्यांच्या चाळी, आठ मजली इमारत राहिली उभी

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात डोंबिवली पश्चिमेतील सरकारी जमिनींवर २०० खोल्यांच्या चाळींचे बांधकाम झाले आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच एका आठ मजली बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.म्हात्रे म्हणाले, ‘आचारसंहितेच्या काळात २०० खोल्यांच्या चाळींचे बेकायदा बांधकाम झाले आहे. याच चाळींना २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला आलेल्या पुराचा फटका बसला. महापालिकाही या प्रकाराला जबाबदार आहे. अधिकाऱ्यांचे अभय असल्यानेच खाडीकिनारी चाळी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करा. चाळींतील २०० खोल्या आणि आठ मजली इमारत उभी राहिल्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.’ते पुढे म्हणाले, ‘बेकायदा चाळी व इमारतींमधील घरे नागरिकांना कमी किमतीत विकली जातात. त्यामुळे त्यात नागरिकांची फसवणूक होते. यंदा अशाच नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. एक तर या बेकायदा चाळी व इमारतींवर हातोडा चालवावा, अन्यथा पुरात बाधित झालेल्या नागरिकांना इमारतींमधील घरे द्यावीत, याचा प्रशासनाने विचार करावा.’सभेला बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी संबंधित प्रभाग अधिकाºयांकडून याविषयीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल पुढील सभेत सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. दुसरीकडे या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाºयांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिले आहेत.टाउनशिपच्या जागेवरही बेकायदा बांधकामेकल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर सापर्डे, उंबर्डे, वाडेघर या परिसरांत महापालिका कोरियन कंपनीच्या गुंतवणुकीच्या आधारे ७०० हेक्टरवर विकास परियोजना (टाउनशिप) उभारणार आहे. त्याचा इरादा सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, योजनेच्या प्रस्तावित जागेवरही चाळी उभारल्या जात आहेत. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा मुद्दा स्थायी समिती सदस्य जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. यासंदर्भात नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे व प्रभाग अधिकाºयांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशा सूचना सभापतींनी दिल्या.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना