शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

परराज्यातील मजुरांच्या घरवापसीसाठी ठाण्यात राबणार १३० नगरसेवकांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 15:25 IST

राज्य शासनाने पराराज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी परवानगी दिल्याने आता ठाणे महापालिकेतील १३० नगरसेवक त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. या मजुरांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभी करणे, त्यांना सर्टीफीकेट देणे यासाठी यंत्रणा काम करीत आहे.

ठाणे : केंद्राकडून पराज्यात अडकून पडलेल्या मजुरांना जाण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यांमध्ये अडकून पडलेल्यांची एकच धांदल उडाली आहे. याचा सगळ्यात मोठा भार शासनाने पोलिसांच्या खांद्यावर दिला असून पोलिसांची आणखी एका जबाबदारीने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. हा भार कमी व्हावा म्हणून ठाणे पोलिसांनी नगरसेवकांची मदत घेऊन परराज्यात जाणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यान्वये काही नगरसेवकांनी परवानगीसाठी लागणारा अर्ज, वैद्यकीय प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम सुरू केले आहे.                  केंद्राने ३ मे पर्यंत देशभरात लॉक डाऊन घोषित केला होता. तो संपण्याआधीच १ मे रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने १७ मे पर्यंत तिसºया टप्प्यातील लॉक डाऊनचा कालावधी वाढविला. मात्र यावेळी परराज्यात अडकून पडलेल्या मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटकांना पुन्हा त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी केंद्राने विशेष परवानगी दिली आहे. त्यान्वये देशभरातील सगळ्या राज्यात हे काम सुरू झाले आहे. परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी, पर्यटक ठिकठिकाणी अडकून पडल्याने त्यांचे हाल होत आहेत. ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात ठाणे महानगर पालिका आणि नगरसेवक आदींच्या माध्यमातून या लोकांना अन्नधान्य व जेवण पुरविले जाते आहे. शाळा, मोकळ्या इमारती, दादोजी कोंडदेव स्टेडियम आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आहे. मुंबईतून आलेल्या मजुरांचे अनेक तांडेही ठाण्याचा आश्रय घेत आहेत. आता केंद्राच्या धोरणानुसार या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्याने ही जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सर्व परिमंडळांना याच्या सूचना दिल्या असून गरजूंना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे काम अधिक सुलभ व्हावे यासाठी सर्व परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांनी त्या त्या परिमंडळातील नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरु वात केली आहे. तर सर्व नगरसेवकांच्या कार्यालयात अर्ज भरून घेण्यासाठी मजुरांची गर्दी वाढू लागली आहे. काही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना ताप आणि इतर आजारांची लक्षणे नसल्याचे वैद्यकीय दाखला देण्याचे सुद्धा काम सुरू केले आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे एकत्र करून ते मजुरीसाठी पोलीस आयुक्तालयात पाठविली जाणार आहेत. नगरसेवकांच्या प्रभागात मोकळ्या जागेत ही कामे सुरू झाल्याने अर्ज भरून आणि डॉक्टरांकडून तपासून घेण्यासाठी परराज्यातील लोकांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात १३० नगरसेवक आहेत. त्यांचा या कामासाठी चांगला उपयोग होत आहे.

  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश आले आहेत की, परराज्यातील मजूर आणि कामगार यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी त्यांना सहकार्य करा. त्यासाठी सरकारने एक कार्यपद्धती तयार केली आहे. ती पद्धती ग्रुपलीडरला समजाऊन सांगितली जात आहे. त्यांच्यार्फत जमा झालेले अर्ज संबंधित कार्यालयात पाठवून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

- संदीप घोसाळकर, सहायक पोलीस आयुक्त

  • माझ्या प्रभागात राहत असलेल्या परराज्यातील मजुरांची व इतर सर्व लोकांची काळजी घेत आहे. रोज ५०० जणांना जेवण पुरविते. आजवर दीड महिन्यात हजारो गरजूंना जीवनावश्यक वस्तूंवर मोफत वितरण केले आहे. सरकारच्या निर्देशाने परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविले जाणार आहे. त्यासाठी त्यांना लागणाºया प्रमाणपत्रांसाठी सहकार्य केले जाते. याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले आहे.

- प्रमिला केणी, विरोधीपक्ष नेत्या, ठामपा. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या