शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्राच्या धाकाने तरुणीवर पाच नराधमांचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:29 IST

भिवंडी-नाशिक मार्गावरील पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

भिवंडी : भिवंडी-नाशिक मार्गावरील पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलास चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीवर पाच जणांनी अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. घटनास्थळी आढळलेल्या मातीवरील पाऊलखुणांनी पोलिसांनी बुधवारी पाच जणांना बेड्या ठोकल्या.शहरातील आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (२६) हा त्याच्या २० वर्षांच्या मैत्रिणीस घेऊन मंगळवारी सायंकाळी दुचाकीने पोगाव पाइपलाइन येथे फिरण्यासाठी गेला होता. रात्री साडेनऊ वाजता ते दोघे घरी जाण्यास निघाले असता, त्यांना पाच जणांनी रस्त्यात अडवले.त्यांनी सिकंदर याच्या डोक्याला गावठी कट्टा व चाकू लावला. त्यानंतर दोघांना पाइपलाइनच्या आडोशाला नेऊन तरुणीवर पाचही जणांनी अत्याचार केला. या घटनेने भयभीत झालेल्या इम्रानने आपल्या मैत्रिणीसोबत तालुका पोलीस ठाणे गाठले. दोघांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या गंभीर घटनेची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौघुले हे आपल्या पथकासह घटनास्थळी गेले. पाइपलाइनच्या मातीच्या भरावावर आढळलेल्या पाऊलखुणांचा पंचनामा करीत आरोपींचा परिसरात शोध घेतला.चौकशीतून किशोर रघुनाथ लाखात (१९) याचे नाव पुढे आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पाच जणांनी मिळून तरूणीवर अत्याचार केल्याचे कबूल केले. त्यानंतर गुरुनाथ गोपाल बारी (२३) यास येवई गावातून, हर्षद हिरामण मटले (१९) याला चाविंद्रा गावातून, तर अविनाश पुंडलिक जाधव (२४) आणि गणेश पवार (२०) या दोघांना शेलार गावातून अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीसुनावली आहे.