शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या तीन दिवसांचा गैरफायदा घेत मुंब्रा-कळवा खाडीत सक्शसन पंपव्दारे रेतीचे मनमानी उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:28 IST

सुटीचा गैरफायदा घेत रेतीमाफियांनी शुक्रवारी रात्रीपासून मुंब्रा व कळवा खाडीत सक्शसन पंपव्दारे मनमानी रेती उत्खनास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने सक्शनपंपव्दारे रेती उत्खनास बंदी घातलेली आहे रेतीमाफियांवर एमपीडीएउ लावण्याची सूचना नुकतीच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहात केलीन जुमानता शासकीय सुटीच्या कालावधीत बिनधास्त व मनमानी रेती उत्खनन

ठाणे : जिल्हा प्रशासनाच्या सुमारे तीन दिवसांच्या सुटीचा गैरफायदा घेत रेतीमाफियांनी शुक्रवारी रात्रीपासून मुंब्रा व कळवा खाडीत सक्शसन पंपव्दारे मनमानी रेती उत्खनास प्रारंभ केला आहे. या खाडी किनारी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात अवैधरेती साटवणुकीवर मोठी कारवाई होऊनही त्यास न जुमानता रेती माफियांनी सुटीच्या या कालावधीत खाडी पोखरून रेती काढण्याचा सपाटा लावला आहे.मुंब्रा खाडीतील रेती उत्खननामुळे रेल्वे मार्गास धोका निर्माण झालेला आहे. खाडीवरील ब्रीजवर या रेती उत्खननाचा परिणाम होत असल्याचा रेल्वेचा अहवाल आहे. तरी देखील त्यास न जुमानता शासकीय सुटीच्या कालावधीत बिनधास्त व मनमानी रेती उत्खनन सक्शसन पंपव्दारे केले जाते. यावेळीही चौथा शनिवार, रविवार आणि नाताळ सुटी लक्षात घेऊन खाडी परिसरात रेती काढणारे डोझर, सक्शसनपंप आदीं मोठमोठ्या आवजारांव्दारे रेती काढण्याचे काम रात्रीपासून सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिलदारांच्या कोणत्याही कारवाईचा या रेतीमाफियांवर किंचितही परिणाम झालेला दिसत नसल्याचे या मनमानी अवैधरेती उत्खनावरून दिसून येत आहे.अवैध रेती उत्खनन व वाहतून करणाऱ्यां  रेतीमाफियांवर एमपीडीएउ लावण्याची सूचना नुकतीच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहात केली आहे. एवढेच नव्हे तर या आधीच उच्च न्यायालयाने सक्शनपंपव्दारे रेती उत्खनास बंदी घातलेली आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खाडीतील रेती उत्खननास बंदी घातलेली असतानाही रेतीमाफिये प्रशासनाच्या करवाईचा विचार न करता बिनदिक्कत रेती काढत आहेत.ठाणे जिल्हा प्रशासनाने पारसिकनगर, डोंबिवली गणेशघाट भागात जेसीबीच्या सहाय्याने अवैध रेतीसाठीचे ४३ हौद तोडले. त्यातील ७८ ब्रास रेतीही शासनाने जप्त केली आहे. कल्याण तहसील कार्यालय, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेचे पथक, व विष्णूनगर पोलीसांनी ही कारवाई केली. या दरम्यान त्यांनी कुंभारखानपाडा गणेशघाट येथे धाड टाकली. याठिकाणी आढळलेला रेतीसाठा त्यांनी ताब्यात घेतला.