शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

वसईतून अंदाजे ५४ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त; ठाणे एफडीएची कारवाई

By अजित मांडके | Updated: November 4, 2022 15:26 IST

केलेल्या कारवाईत प्रामुख्याने विविध मसाल्यांचा समावेश आहे.

ठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील वसई येथून अंदाजे ५४ लाखांचा संशयित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. गुरुवारी केलेल्या कारवाईत प्रामुख्याने विविध मसाल्यांचा समावेश आहे.

दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह "खाद्यतेल" व "पावडर मसाले" यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.त्यानुसार अन्न व औषध प्रशासन,कोकण विभाग,सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांना मिळालेल्या  माहितीच्या आधारे, गुरुवार ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील वसई (पूर्व) नायगाव येथील मेसर्स जे. जे. सिझनिंगअँड स्पाइसेस,या ,"उत्पादक" अन्न आस्थापनातून हळद पावडर (वजन ३,४०२ किलो), धणे पावडर (वजन ५१९ किलो), जेरालू पावडर (वजन ६२८ किलो), जलजीरा पावडर (वजन १,२५८ किलो), गरम मसाला (वजन १,०६९ किलो), चिकन मसाला (वजन ६०६ किलो), किचन किंग मसाला (वजन ८३८ किलो),अप मसाला (वजन ६७८ किलो), लोणचे मसाला (वजन १,८७३ किलो), चिवडा मसाला (वजन २,७९८ किलो), चटपटा मसाला (वजन १२३ किलो), लाल मिरची पावडर (वजन ७९६ किलो), व्हाईट चायनीज मसाला (वजन ३९८ किलो), शेजवान मसाला (वजन ९६ किलो) तसेच मालवणी मिक्स मसाला (वजन १३ किलो) असा एकूण रुपये ५३ लाख ७७ हजार ३२२ रुपये किंमतीचा संशयित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही करावाई  अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग, सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पालघर अन्न सुरक्षा अधिकारी धनश्री ढाणे, प्रवीण सूर्यवंशी, दत्ता साळुंखे व योगेश ठाणे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी