शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३४ हजार हेक्टर शेती सिंचनाचा पाणलोट विकास मंजुरी वसुंधरावर आवलंबून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 19:37 IST

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणून राबवण्यात येत असलेले प्रकल्प आता ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना’या नावे राबवले जात आहेत. समूह पध्दतीने व लोकसहभागातून जिल्ह्यात मृदू व जलसंधारणी कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे शेती सिंचन वाढवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या पाणलोट क्षेत्राचा विकास साधला जाणार आहेत. याव्दारे जिल्ह्यात ३४ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर उपचार साधण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी २०१० ते २०१५ या कालावधीपासून प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत

ठळक मुद्देहाती घेतलेल्या दोन हजार २२६ हेक्टर पाणलोट विकास प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटी ८३ लाखांचा नियतव्यय मंजूर आहे.एक कोटी ६९ लाखांचा निधी उपलब्ध असून त्यातून केवळ १९ लाख.२९ हजार रूपये खर्च माळरान हिरवे राहील, जंगलात पशुपक्षांसह जनावरांना पाणी उपलब्ध होईल. विहिरींचा पाणी साठा वाढेल.

सुरेश लोखंडे,ठाणे : जिल्ह्याताील शेती सिंचन वाढवण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून पाणलोट विकास हाती घेतला. ३४ हजार ५४ हेक्टर क्षेत्रा विकास प्रस्तावीत आहे. मात्र यापैकी केवळ दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्रावरील प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. ते पुणे येथील वसुंधरा विभागाच्या कार्यालयात धूळखात पडून असल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम म्हणून राबवण्यात येत असलेले प्रकल्प आता ‘प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना’या नावे राबवले जात आहेत. समूह पध्दतीने व लोकसहभागातून जिल्ह्यात मृदू व जलसंधारणी कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे शेती सिंचन वाढवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या पाणलोट क्षेत्राचा विकास साधला जाणार आहेत. याव्दारे जिल्ह्यात ३४ हजार ५४ हेक्टर क्षेत्रावर उपचार साधण्याचे प्रस्तावित आहेत. यासाठी २०१० ते २०१५ या कालावधीपासून प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. यात ठिकठिकाणच्या तब्बल नऊ मेगा पाणलोट विकास प्रकल्पाचा समावेश आहे. यातील छोटासा भिवंडी तालुक्यातील एक प्रकल्प वर्षभरापूर्वी पूर्ण होऊन तो ग्राम पंचायतीकडे हस्तांतरीत केला.परंतु या आर्थिक वर्षासाठी तब्बल दोन हजार २२६ हेक्टर क्षेत्राचे उद्ष्ठ आहे. मात्र या पाणलोट विकास क्षेत्राचे प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. ते पुणे येथील वसुंधरा विभागाच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये कल्याण तालुक्यातील ११८.८० हेक्टर, अंबरनाथमधील ९८२.८३ हेक्टर, मुरबाड तालुक्यामधील २२.५२ हेक्टर क्षेत्रास उपयुक्त ठरणाºया पाणलोट विकास प्रकल्पाचा समावेश आहे. तर शहापूर तालुक्यामधील एक हजार १०२.३४ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ६५/५१ एकर क्षेत्राचे काम आतापर्यंत साध्य झाल्याचे. या तालुक्यातील एक पाणलोट समूह सामाजिक वनीकरणमध्ये असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल देखील मंजुरीच्या प्रतिक्षेत पुणे येथे पडून आहे.** या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या कामे गांभीर्याने केल्यास शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. माळरान हिरवे राहील, जंगलात पशुपक्षांसह जनावरांना पाणी उपलब्ध होईल. विहिरींचा पाणी साठा वाढेल.** हाती घेतलेल्या दोन हजार २२६ हेक्टर पाणलोट विकास प्रकल्पासाठी सुमारे १२ कोटी ८३ लाखांचा नियतव्यय मंजूर आहे. यापैकी एक कोटी ६९ लाखांचा निधी उपलब्ध असून त्यातून केवळ १९ लाख.२९ हजार रूपये खर्च झाल्याचे आढवा बैठकीत उघड झाले.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी