शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बुरखाधारी मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर महिलांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:27 IST

प्रत्येक केंद्रावर व्यवस्था; निवडणूक यंत्रणेने दिली माहिती

- कुमार बडदे मुंब्रा : मुस्लिमबहुल मुंब्य्रातील बुरखाधारी महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी मुंब्य्रातील मतदानकेंद्रांवर विशेष महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.३१ आॅगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या मतदारयादीनुसार, या मतदारसंघामध्ये एकूण तीन लाख ५१ हजार २८४ मतदार आहेत. यामध्ये एक लाख ६० हजार ६९४ महिला, तर एक लाख ९० हजार ५९० पुरु ष मतदार आहेत. सशस्त्र दलातील मतदारांची संख्या ८५, तर दिव्यांग मतदारांची संख्या ६० आहे. मतदानासाठी ७१ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, कळव्यातील १७७ तसेच मुंब्य्रातील १७६ आणि साहाय्यकारी अशा एकूण ३५५ केंद्रांवर मतदान होणार आहे. कळव्यातील मनीषानगरमधील एक मतदान केंद्र महिला संचालित करणार आहेत. निवडणुकीशी सर्व संबंधित कामे कौसा परिसरातील श्री मौलाना अबुल कलाम आझाद क्र ीडा संकुलामध्ये होणार असून, मतदानयंत्रे ठेवण्यासाठी येथेच स्ट्राँग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन कोर्टाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. मतदारसंघातील सर्व मतदानकेंद्रे तळमजल्यावर आहेत. मतदानापूर्वी काही दिवस आधी ३४५ बुथ लेव्हल आॅफिसर्स मतदारांच्या नावाच्या स्लिप मतदारांच्या घरी पोहोचवल्या जाणार आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॅली, रोड शो, प्रचारसभा आदी निवडणूक आयोगाशी संबंधित परवाने लवकरात लवकर देण्यासाठी मुख्य कार्यालयाच्या परिसरात एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.शासकीय इमारतीवर प्रचार साहित्य लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रि या सुरळीत आणि मोकळ्या वातावरणात पार पडावी, यासाठी संभाव्य उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच पोलीस अधिकाºयांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी येणाºयांना हवी असलेली माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मदतकेंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती देऊन, मतदारांनी निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काकडे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Muslimमुस्लीमVotingमतदान