शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिका आयुक्त पदी काटकर यांची नियुक्ती

By धीरज परब | Updated: August 9, 2023 20:54 IST

मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची अडीज वर्षांच्या कार्यकाळा नंतर शासना कडून बदली करण्यात आली आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची अडीज वर्षांच्या कार्यकाळा नंतर शासना कडून बदली करण्यात आली आहे . त्यांच्या जागी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सनदी अधिकारी असलेले काटकर यांनी बुधवारी सायंकाळी पालिका मुख्यालयात येऊन पदभार स्वीकारला.   

तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ढोले यांची ओळख होती . नोव्हेम्बर २०२० मध्ये शासनाने दिलीप ढोले यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती . अतिरिक्त आयुक्त म्हणून आलेल्या ढोले यांना शासनाने ३ मार्च २०२१ रोजी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त केले होते . कोरोनाच्या काळात तसेच स्वच्छता अभियान, माझी वासुधंरा अभियान आदी उपक्रमात महापालिकेने उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल ढोले यांना शासनाने विविध पारितोषिके देऊन सन्मानित केले होते . 

तर दुसरीकडे ढोले हे आयुक्त पदी पात्र नसल्या चे आरोप करत काहींनी शासना सह न्यायालयात सुद्धा धाव घेतली होती . २००० सालच्या बनावट युएलसी प्रमाणपत्र प्रकरणी २०१६ साली ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणातच ईडी ने इंट्री घेत पालिका आयुक्तां कडून संबंधित प्रकरणाची कागदपत्रे मागवली होती .  

दरम्यान बुधवार ९ ऑगस्ट रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या पत्रा नुसार  सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची मीरा भाईंदर महापालिका आयुक्त पदी नियुक्ती केली आहे . ढोले यांच्या कडून पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे गद्रे यांनी म्हटले आहे . 

त्यानुसार सायंकाळी काटकर यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला . अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त कल्पिता पिंपळे , मारुती गायकवाड , संजय शिंदे , रवी पवार आदींनी नवीन आयुक्तांची भेट घेऊन स्वागत केले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर