शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागार नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:17 IST

मीरा भाईंदर व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण, दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजित दोन मेट्रो मार्गांच्या उभारणीला वेग येणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो भवन उभारणीसाठीही सल्लागार कंपनीची नियुक्ती झाली आहे.प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ एलिव्हेटेड मार्ग व स्थानकांच्या उभारणीसाठी मे. अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरची निवड करण्यात आली. धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम नाका व कापुरबावडी या स्थानकांची उभारणी ही कंपनी करेल. मे. सिस्ट्रा फ्रान्स, मे. कन्सल्टिंग ग्रुप लि. व मे. सिस्ट्रा एम. व्ही. कन्सल्टिंग इंडिया लि. या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण ते भिवंडी मेट्रो-५, दहिसर पूर्व ते मीरा भार्इंदर व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो-९ मार्गाच्या स्थापत्यकामाची जबाबदारी या कंपनीवर असेल. पूर्व - पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील पादचारी पूल, पादचारी भुयारी मार्ग तसेच वाहनांसाठीच्या भुयारी मार्गांची डागडुजी केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २७ लाखांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे.या दोन्ही महामार्गांच्या डागडुजीचे काम मुंबई प्राधिकरणाकडे आहे. त्यात पादचारी पूल व भुयारी मार्गांचा समावेश आहे. मध्यंतरी मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेनंतर सर्वच यंत्रणांच्या अखत्यारीतील पुलांच्या डागडुजीचा, त्याचबरोबर पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध यंत्रणांनी त्यांच्या हद्दीतील पुलांची कामे हाती घेतली आहेत.पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील काही भाग प्राधिकरणाच्या हद्दीत येतो. तेवढ्या भागातील डागडुजीची कामे करणे ही प्राधिकरणाची जबाबदारी आहे. या दोन्ही महामार्गांवरील अनेक पादचारी पुलांची अवस्था वाईट झाली आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगर तसेच कांजूरमार्ग येथील पादचारी पुलांचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे पादचाऱ्यांसाठी एक भुयारी मार्ग आहे. त्यानंतर मुलुंड-नाहुर रोड, मुलुंड म्हाडा कॉलनी येथे वाहनांसाठी भुयारी मार्ग आहे. या महामार्गांवरील डागडुजीच्या कामाकरिता प्राधिकरणाने २७ लाख ५७ हजार रुपयांची निविदा काढली आहे. हे काम वर्षभर सुरू राहणार आहे.