शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना आरोग्य रक्षणासाठी जीवन विमा लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 17:28 IST

महापालिकेत साफसफाईचे काम करणाºया कंत्राटी स्वरुपातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ५० लाखांचा विमा काढण्यात यावा अशी मागणी श्रमिक जनता संघाच्या वतीने महापालिककेडे करण्यात आली आहे.

ठाणे : कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका आता महापालिकेतील कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कामगारांनाही सहन करावा लागत आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ बरोबरच शहरातील कचरा सफाई कामगार देखील आपले जीव मुठीत धरून सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून त्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे अशी मागणी श्रमिक जनता संघाचे सचिव जगदीश खैरालीया यांनी महापालिकेकडे केली आहे.               ठाणे महापालिकेच्या कायम सेवेतील कामगारांप्रमाणेच कंत्राटी कामगार प्रत्यक्ष घाणीत उतरून काम करीत आहेत. या कामगारांना आरोग्याची सुरिक्षततेची जबाबदारी संबंधित ठेकेदारांकडून योग्य दिली जात नाही, ईएसआयसी योजना अर्थात कामगार विमा योजनेचे हफ्ते देखील ठेकेदारांकडून नियमित भरले जात नाही. अनेक ठेकेदार त्यांच्या कडील सर्व कामगारांना ही सुविधा देत नसून नावापुरते खानापूर्तीसाठी फक्त नोंदणी केली जाते. अश्या परिस्थितीत शहरातील घाण सफाई करणारे या कामगारांना कोरोना संक्र मणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ते सफाई, घंटागाडी, स्मशानभूमी, दवाखाने, हॉस्पिटल, कीटकनाशक फवारणी आणि सार्वजनिक शौचालय सफाई करणारे सफाई कामगार, वाहन चालक वाल्वमेन आदी नागरिकांना सार्वजनिक सुविधा पुरवणारे सर्व कंत्राटी कामगारांना सरकारने जाहीर केल्यानुसार पॅरामेडिकल स्टाफ व अन्य कायम कामगारांच्या प्रमाणे ५० लाखांचा विमा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच ज्या कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन मुळे प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने कामावर हजर होता येत नाही. त्या बाबतीत केंद्र व राज्य शासनाने परिपत्रक काढून जाहीर केल्याप्रमाणे कोणा ही कामगाराला कामावरून कमी करू नये. या काळातील वेतन कपात करू नये, याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश द्यावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.फायलेरिया विभागातील फवारणी करणारे कामगार तसेच पाणी पुरवठा विभागातील कामगारांना वेतन कायद्यानुसार व वेळेत मिळत नसल्याच्या तक्र ारी बाबतीत संबंधित अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालतात. या बाबतीत तात्काळ सखोल चौकशी करून कामगारांना सुधारित किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून थकीत वेतनासह वेळेत वेतन अदा करण्यात यावे अशी मागणही त्यांनी या निवदेनाद्वारे केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या