शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरटीईच्या १२ हजार शालेय जागांसाठी २७ हजार ३५३ हजार बालकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:20 IST

२५ टक्के प्रवेश राखीव : जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी परिवारातील बालकांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या त्यांच्या घराजवळील शाळेत २५ टक्के प्रवेश राखून ठेवले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश आहे. त्यातील १२ हजार ७४ शालेय प्रवेशासाठी २७ हजार ३५३ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत शिकण्याचा हक्क मिळाला आहे. मात्र, शाळांकडून विविध शुल्काच्या माध्यमातून मोठमोठ्या रकमांची मागणी केली जाते. त्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांकडून पाठिंबा दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांना प्राधान्याने या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यास आळा घालण्यासाठी या गरिबांच्या बालकांसाठी या मनमानी करणाऱ्या शाळांमध्ये आता एकूण प्रवेशाच्या २५ टक्के शालेय प्रवेश सक्तीने राखीव ठेवले जात आहेत. यानुसार जिल्ह्यातील ६७७ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी ११ हजार ११४ व पूर्व प्राथमिकसाठी ९६० बालकांचे शालेय प्रवेश राखीव ठेवले आहेत.या १२ हजार ७४ शालेय प्रवेशासाठी यंदा पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यासाठी तब्बल २७ हजार ३५३ अर्जांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित आठ हजार २७६ बालकांची नोंदणी अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. या प्राप्त अर्जांतून सद्य:स्थितीपर्यंत १९ हजार ७७ हजार अर्ज मान्य झाले आहेत. अपूर्ण अर्जांच्या पूर्ण नोंदणीसाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न करून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली आहे. या प्राप्त अर्जांतून लॉटरी सोडतीद्वारे बालकांचे प्रवेश संबंधित शाळेत करण्यात येणार आहेत. याद्वारे मिळणारे शालेय प्रवेश २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राहणार आहेत.तालुका    शाळाअंबरनाथ -     २६७५भिवंडी मनपा -    २२७३भिवंडी ग्रा. -    ८६१कल्याण ग्रा. -    २२९९कल्याण डोंबिवली -    २७७९मीरा भाईंदर -     ३९५मुरबाड-     १०१नवी मुंबई-     ६४१०शहापूर-     ६५०ठाणे मनपा १ -     १४४७ठाणे मनपा २ -     ३५५०उल्हासनगर-     ९७७

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा