मुंब्रा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पोलिस आयुक्त आणि गाझियाबादचे पोलिस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी धर्मांतराबाबतचे आरोप सिद्ध करावेत किंवा मुंब्र्यातील नागरिकांची माफी मागावी, अशी कायदेशीर नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहचिटणीस सय्यद अली अशरफ उर्फ भाईसहाब यांनी पाठवली आहे.काही दिवसांपूर्वी गाझियाबादचे पोलिस उपायुक्त अग्रवाल यांनी ऑनलाइन मोबाइल गेमच्या आड मुंब्रा शहरातील ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचे वक्तव्य केल्याचा दावा अशरफ यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे नागरिकांचा या शहराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याचे दूरगामी परिणाम येथील नागरिकांना सहन करावे लागतील. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. स्थानिक पातळीवर सर्व स्तरांतून वेगवेगळ्या मार्गाने निषेध व्यक्त होत आहे. यामुळे वक्तव्य करणाऱ्यांनी एकतर धर्मांतर केलेल्यांची नावे जाहीर करावीत किंवा माफी मागावी, अशी मागणी अशरफ यांनी नोटिसीत केली आहे.
मुंब्रावासीयांची माफी मागा; राष्ट्रवादीची योगींना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:47 IST