शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीपीप्रकरणी दिरंगाई केल्यास थेट कारवाई करण्याचा पालिकांना इशारा, सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:56 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत मल-जल शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी निधी दिला आहे. असे असतानाही प्रकल्प उभारण्यात होणारी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.

कल्याण : स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य सरकारने अमृत योजनेंतर्गत मल-जल शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी निधी दिला आहे. असे असतानाही प्रकल्प उभारण्यात होणारी दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. चालढकल न करता तातडीने प्रकल्प उभारा. आता न्यायालयाकडून वेळ दिला जाणार नाही, तर थेट कारवाईचे आदेश दिले जातील, असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीविषयी वनशक्ती या पर्यावरण संस्थेचे दयानंद स्टॅलीन यांनी ही माहिती दिली. वनशक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात सरकारने बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकांकडून एसटीपी प्रकल्प उभारण्यात काय उपाययोजना केल्या जात आहे, याची माहिती दिली होती. त्याआधी हे प्रकल्प नोव्हेंबर २०१९ अखेर पूर्ण करून कार्यान्वित केले जातील. त्यामुळे प्रदूषण रोखले जाईल, असा दावा केला होता. एमआयडीसीकडून सांडपाणी प्रकल्पाविषयीच्या काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचीही माहिती सादर केली होती.मात्र, प्रकल्प उभारण्याची नोव्हेंबर २०१९ अखेर ही डेडलाइन हुकली असल्याचा मुद्दा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सुनावणीदरम्यान वनशक्तीच्या वकिलांनी मांडला. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत या प्रकरणाची सुनावणी पुन्हा दुपारी २ वाजता घेण्यात येईल, असे सांगितले. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वकिलांनी न्यायालयास विनवणी करीत वेळ वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने कितीवेळा सारखासारखा वेळ वाढवून द्यायचा, असा सवाल विचारला. आता प्रकल्पाच्या कामाबाबतच्या प्रगतीचा आढावा अहवाल लवकर सादर करा. किती प्रगती झाली, हे सांगा. चालढकल खपवून घेतली जाणार नाही, असे खडसावले. न्यायालयाने या प्रकरणावर जास्त वेळ न देता पुढील सुनावणी १० डिसेंबरला घेतली जाईल, असे सांगितले.रासायनिक प्रदूषणप्रकरणी १६ डिसेंबरला सुनावणीकल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरातील रासायनिक कारखान्यांतून होत असलेले जलप्रदूषण रोखण्यासाठी वनशक्तीने २०१३ मध्ये याचिका दाखल केली आहे. ही याचिका हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे.कारखानदारांना प्रदूषणप्रकरणी लवादाने दंड आकारला आहे. ही रक्कम ९५ कोटी रुपये आहे. ही रक्कम योग्य नाही. ती मान्य नसल्याचा मुद्दा कारखानदारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या मुद्यावर १६ डिसेंबरला लवादासमोर सुनावणी होणार आहे.लवादाने म्हटले आहे की, दंडाच्या रकमेच्या मुद्यावर ही सुनावणी होणार आहे. कारखान्यांकडून प्रदूषण केले जात आहे. त्यावर वाद-युक्तिवाद केला जाणार नाही, अशी माहिती ‘वनशक्ती’चे स्टॅलीन यांनी दिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणे