शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गेली रक्कम कुणीकडे?

By admin | Updated: April 4, 2016 01:57 IST

फेरीवाले, अनधिकृत बांधकामे हटवणे, यासाठी घेतलेल्या पोलीस बंदोबस्ताचे तब्बल एक कोटी ३३ लाख देण्यासाठी सरकारी आदेश दाखवा, असे आव्हानच पोलीस खात्याला देणाऱ्या पालिकेचाच खोटारडेपणा

मीरा रोड : फेरीवाले, अनधिकृत बांधकामे हटवणे, यासाठी घेतलेल्या पोलीस बंदोबस्ताचे तब्बल एक कोटी ३३ लाख देण्यासाठी सरकारी आदेश दाखवा, असे आव्हानच पोलीस खात्याला देणाऱ्या पालिकेचाच खोटारडेपणा उघड झाला आहे. पालिका दरवर्षी अंदाजपत्रकात अतिक्र मण कारवाईसाठीच्या खर्चापोटी पोलीस बंदोबस्ताकरिता तरतूद करत आली आहे. पालिकेने मागील सहा वर्षांत सुमारे एक कोटी ४० लाख केल्याचेही दाखवले आहे . मग, ही रक्कम गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लोकमत’च्या शनिवारच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये मीरा-भार्इंदर महापालिकेने पोलीस बंदोबस्तासाठीचे शहरातील सहा पोलीस ठाण्यांचे एक कोटी ३३ लाख रु पये थकवल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली आहे. पोलीस बंदोबस्ताचे पैसे देण्यास महापालिका तयार नसून त्यांनी तसा काही सरकारी आदेश असेल तर दाखवा, आम्ही पैसे देतो, असा पवित्रा घेतला आहे. एकंदर पालिकेने घेतलेल्या या पवित्र्यामुळे पोलीस प्रशासनही थकबाकी वसूल करण्यासाठी फारसे गंभीर नाही, असेच चित्र आहे. मीरा-भार्इंदर महानगरपालिका फेरीवाले, अतिक्र मण व अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी व अन्य कामांसाठी पोलीस बंदोबस्त मागत असते. फेब्रुवारीअखेरपर्यंत शहरातील सहा पोलीस ठाण्यांची मिळून एक कोटी ३३ लाख ७५ हजार इतकी थकबाकी पालिकेकडे आहे. यामध्ये काशिमीरा पोलीस ठाण्याचे सर्वात जास्त म्हणजे ७५ लाख ४४ हजार ४७१ रु पये पालिकेने थकवले आहे. मीरा रोड पोलीस ठाण्याची ३० लाख ६७ हजार, भार्इंदर पोलीस ठाण्याची ११ लाख १७ हजार, नवघर पोलीस ठाण्याची ९ लाख ७७ हजार, नयानगर पोलीस ठाण्याची ५ लाख २६ हजार, तर उत्तन सागरी पोलीस ठाण्याची एक लाख ४१ हजार इतकी थकबाकी आहे. पालिका प्रशासन एकीकडे अतिक्र मणविरोधी कारवाईकरिता लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी पैसे देण्याची तरतूद नसून तसा काही सरकारी आदेश नसल्याचे सांगत आहे. पण, दुसरीकडे पालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी लेखाशीर्षाखाली सुरक्षारक्षक व पोलीस बंदोबस्तासाठी होणाऱ्या खर्चासाठी तरतूदही केली जात आहे. केवळ सहा वर्षांत तब्बल १ कोटी ४० लाख खर्च पालिकेने केला आहे. अतिक्र मण बंदोबस्तासाठी सहा वर्षांत जर पालिकेने इतका खर्च केला आहे, तर तो पैसा कुठे गेला, याची माहिती मात्र एकही विभाग द्यायला तयार नाही. (प्रतिनिधी)