शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

ठाणे महापालिकेचे कोणताही करवाढ, दरवाढ नसलेले महापालिकेचे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 5:12 PM

कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेले परंतु ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करणारे, मुख्य मेट्रो सोबतच, अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतुक आदी प्रकल्प हाती घेण्याचे पालिकेने निश्चित करुन ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

ठळक मुद्देवाहतुक कोंडी सोडविण्यावर भरअंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतुक होणार सुरु

ठाणे - धोकादायक, अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्यांसाठी क्लस्टर योजना, वाहतुक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय योजना, मुख्य मेट्रोच्या जोडीला अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतुक, वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंट प्रकल्प आदी महत्वांच्या योजनांनी भरलेला परंतु ठाणेकरांनावर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ नसलेले २०१७-१८ चे ३०४७.१९ कोंटीचे सुधारीत आणि २०१८-१९ चे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी महासभेला सादर केले.             ठाणे महापालिकेत स्थायी समिती गठीत नसल्याने सोमवारी हे अंदाजपत्रक थेट महासभेला सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकात यंदा कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ सुचविण्यात आलेली नाही. वाहतुक कोंडीमुक्तीसाठी यापुर्वीच ठाणे महापालिकेच्या वतीने रस्ते रुदींकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या रस्त्यामध्ये ६६ किमीची वाढ होऊन एकूण ४२१.८५ किमीचे रस्त्यांचे जाळे तयार होणार आहे. तीन हात नाका येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर बांधून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाअंतर्गत वडाळा ते कासारवडवली या १२.४२ किमी लांबीच्या टप्पा ४ चे काम येत्या मे अखेर सुरु होईल असा आशावाद यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तसेच या जोडाला अंतर्गत मेट्रो देखील सुरु करण्याचा पालिकेचा मानस असून हा मार्ग २८ किमी लांबीचा असणार आहे. ठाणे शहराला लाभलेल्या ३२ किमी खाडी किनाºयाचा विचार करुन अंतर्गत जलवाहतुक सुरु करण्यात येणार असून यासाठी १० कोटींची तरतूद, पीआरटीएस हा देखील एक वेगळा प्रकल्प पालिका राबविणार असून यामध्ये २५ किमी लांबीच्या मार्गावर ही योजना राबविली जाणार आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्वावर राबविली जाणार आहे. भारतातील पहिला ६०० सायकलींचा स्वंयचलित सार्वजनिक प्रकल्प देखील पालिका राबवित असून शहरातील ५० सायकल स्टेशनवर या सायकली उपलब्ध होणार आहेत. या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत होणार असून, वाहतुक कोंडीपासून सुटका होणार आहे.           ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेला क्लस्टर योजना देखील राबविली जाणार आहे. आॅक्टोबर २०१८ पर्यंत यातील पहिल्या योजनाचा नारळ वाढविला जाणार आहे. चौपाटी विकास, फोल्टींग मार्केट, पार्कींग प्लाझा, उपवन जमीखाना, शाळा बांधकाम, दवाखाने बांधकाम, तीन हात नाका मिनी मॉल, स्मशानभुमी व क्रबस्तान, सर्वधर्मीय स्मशानभुमी, स्ट्रक्चर सुविधा विकसन, सेंट्रल पार्क, ग्लोबल इम्पॅक्ट हबच्या माध्यमातून एकाच छताखाली रोजगाराच्या संधी, दिवा - मुंब्रा पाणी पुरवठा योजनेचे रिमॉडेलींग योजना आता ठाणे महापालिका राबविणार असून भुयारी गटार योजनेच्या ४ टप्यासाठी पालिका निधी खर्च करणार आहे. स्काडाद्वारे पाणी नियोजन, स्मार्ट मीटरींग, पाणी गळती योजना, विहिरी व कुपनलिकांवर आर.ओ. प्लान्ट बसविणे, मलवाहीन्यांचे हाऊस कनेक्शन, अपांरपारीक उर्जा विकास, डाटा सेंटर व कमांड कंट्रोल रुम, सोलार डीश, मायक्रोहायड्रो पॉवर, जिओ थर्मल ऊर्जा, उपवन तलावावर हायड्रोपोनिक्स, सेन्सर्स उभारणे, आरोग्य सुविधा देखील उंचावण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत १०० टक्के कचºयावर प्रक्रिया करुन कचºयाची समस्या मार्गी लावण्यावर भर, उद्यान विकास, वृक्ष लागवड अंतर्गत एक मुल एक झाड ही नवी योजना राबविण्यात येणार असून १ लाख वृक्षांची लागवड करण्यात येऊन, सुंगधी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वेस्ट रिसायकलींग प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, खाडीच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी वापरात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून स्मार्ट गर्ल योजना, स्टुडंट इन्फरमेशन कार्ड, वस्ती शाळा, पालक बंधन योजना, विशेष फेरी बस सेवा, टॅब पुरविणे, खेलो इंडिया योजना, महिला व बालकल्याण अंतर्गत देखील मुलींचा सर्वांगीन विकास, बालविकास योजना, आरोग्य सुविधा, स्वंयरोजगार योजना राबविण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी १ हजार स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कर्मचारी कल्याण योजना देखील राबविण्यात येणार आहे. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी ५० कोटी आणि पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हैप्पीनेस इंडेक्स वाढविणारठाणे महापालिका आयुक्तांना यंदा प्रथमच हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी तब्बल १०० कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नागरीकांचे जीवनमान उंचावतांनाच याला आंतरराष्टÑीय प्रकल्पांची जोड देऊन त्यांचे हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये ग्लोबल चॅलेंड फंड, सार्वजनिक व खाजगी शाळा भागीदारी, रेडीओ स्कुल, सर्वांसाठी कौशल्य विकास, रे आॅफ लाईट, क्षयरोग नियंत्रण वाहन, समुपदेशन केंद्र, धुर विरहित केंद्र, अनुकुल ट्रॅफीक व्यवस्थापन यंत्रणा, क्षयरोग दत्तक योजना, कुटुंब सौख्य योजना, सुदृढ मातृत्व योजना, प्रसुतीपुर्व बाळाच्या तपासण्या, वैद्यकीय सहाय्य योजना, राजमाता जिजाऊ बेटी बचाओ व बेटी पढाओ योजना, हिरकणी योजना आदींचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBudgetअर्थसंकल्प