शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये कोरोनाच्या कहरमुळे चिंता; 8 दिवसातच तब्बल 38 जणांचा बळी तर 561 रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:07 IST

मीरा भाईंदरमध्ये हल्ली कोरोनाचे रोजचे येणारे आकडे व कोरोनाचे बळी पाहून चिंतेचे वातावरण आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  मीरा भाईंदर मध्ये रोज कोरोना रुग्ण व मृत्यूचे आकडे पाहून चिंता वाढली असून गेल्या 8 दिवसात कोरोनाचे तब्बल 561 रुग्ण सापडले आहेत . गुरुवारी सर्वात जास्त 145 नवे रुग्ण सापडले . तर गेल्या अडीच महिन्यात कोरोना मुळे एकूण 71 जणांचा मृत्यू झाला असला यातील निम्म्या पेक्षा जास्त तब्बल 38 जणांचा मृत्यू गेल्या 8 दिवसात झाला आहे .

मीरा भाईंदरमध्ये हल्ली कोरोनाचे रोजचे येणारे आकडे व कोरोनाचे बळी पाहून चिंतेचे वातावरण आहे . आज काय आकडा येतो याची चिंता आणि धास्ती बहुतांश लोकांना वाटू लागली आहे . 27 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता . तर 7 एप्रिल रोजी कोरोनाने शहरातला पहिला बळी घेतला होता .  11 जून पर्यंत शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1338 इतकी झाली असली तरी यातील 699 रुग्ण बरे झालेले आहेत . सध्या  568 कोरोना रुग्ण एक्टीव्ह आहेत . आता पर्यंत कोरोना मुळे 71 जणांचा मृत्यू झालेला आहे . 

परंतु 3 जून ते 11 जून या अवघ्या 8 दिवसांच्या काळातच कोरोनाचे तब्बल 561 नवे रुग्ण सापडले आहेत तर 38 जणांचा या काळात मृत्यू झाला आहे . 3 जून रोजी सर्वात जास्त 8 जणांचा मृत्यू झाला . तर 11 जून रोजी सर्वात जास्त 145  इतके कोरोना रुग्ण आढळून आले . कोरोनाचे रोजचे आकडे वाढते आहेतच पण मृत्यूचे प्रमाण देखील 6 टक्क्यांच्या घरात पोहचले आहे .  त्यामुळे लॉक डाऊन शिथिल केले असताना अनेकां कडून सुरक्षेचे नियम व निर्देश पाळले जात नसल्याने स्थिती बिकट होत चालली असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे . 

केस पाहून कळले मृतदेह चुकीचा आहे 

महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात बुधवारी भाईंदर पश्चिम भागातील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता . मृताच्या मुलास मृतदेह पूर्णपणे रॅप करून देण्यात आला . परंतु मृतदेहाच्या डोक्यावर केस होते तर मृत वडिलांच्या डोक्यावर मात्र केस नव्हते हि बाब मुलाच्या लक्षात आल्याने त्याने त्वरित कर्मचाऱ्यांना सदर मृतदेह आपल्या वडिलांचा नसल्याचे सांगितले . त्यामुळे खळबळ उडाली . नंतर पडताळणी करून मुलास वडिलांचा मृतदेह देण्यात आला . केसां मुळे वेळीच लक्षात आले अन्यथा अनर्थ झाला असता असे परिचिताने सांगितले . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस