शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

यापुढेही अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्रपणे सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 14:14 IST

महापालिका अतिक्रमण उपायुक्तांचा अनाधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांना इशारा. दोन दिवसापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर झालेला हल्ला हा केवळ त्यांच्यावर नसुन हा संपूर्ण प्रशासनावर हल्ला होता. त्यामुळे काम बंद आंदोलन तर केले आहेच, शिवाय यापुढे शहरातील अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि फेरीवाल्यांच्या विरोधात सुरु असलेली कारवाई अधिक तीव्रपणो केली जाईल असा इशारा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमळे यांनी दिला.

 दोन दिवसापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर बुधवारी या हल्याच्या निषेर्धात एमएमआर रिझनमधील ४० हजार कर्मचारी अधिका:यांनी काम आंदोलन केले. ठाणे  महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा:यांनी देखील काम बंद आंदोलन करीत या घटनेची तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला त्यांच्यावर नसून संपूर्ण प्रशासनावर असल्याचे सांगत अशा घटना यापुढे घडू नयेत या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त वाघमळे यांनी दिली. अशा भ्याड हल्याला आम्ही जुमणार नसून यापुढे जाऊन शहरातील अनाधिकृत बांधकामे असतील किंवा अनाधिकृत फेरीवाले असतील त्यांच्या विरोधातील कारवाई अधिक तीव्रपणो केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

  ठाण्यात सहाय्यक आयुक्त यांच्यावर अनिधकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करीत असतांना, झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तसेच एका व्यक्तीवर कारवाई करून चालणार नाही तर, अशा प्रवृत्तींना पायबंद घातला पाहिजे. तर, कायद्यामध्ये देखील सुधारणा करण्यात यावी अशी मागणी अतिरिक्त आयुक्त तथा मुख्यकार्यकरी अधिकारी संघटनेचे सदस्य ओमप्रकाश दिवटे यांनी हल्य्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनाच्यावेळी केली. तर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील अशाच पध्दतीने काम बंद आंदोलन करुन काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पहिल्या टप्यात जिल्हाधिकरी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्नी, गृहमंत्नी आणि पालकमंत्री यांची देखील भेट घेणार आहे. या कामबंद आंदोलनाच्या माध्यामतून आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या हाच त्यामागचा उद्देश आहे. (रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी, ठाणे)

टॅग्स :thaneठाणेEnchroachmentअतिक्रमण