शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

ठाण्यात पोलिस भरतीवर अ‍ॅण्टी डोपिंग पथकाची करडी नजर, दोषींवर होणार फौजदारी कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: January 09, 2023 10:47 PM

भरतीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतूनही त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.

ठाणे : सध्या राज्यभरात पोलिस भरती सुरू आहे. रायगड आणि नांदेड येथील भरतीदरम्यान परीक्षार्थींनी अ‍ॅक्सी बूस्ट हे अंमली पदार्थ घेतल्याची बाब उघड झाल्यामुळे ठाणेपोलिसांनीही असा प्रकार ठाण्यात घडू नये यासाठी विशेष अ‍ॅन्टी डोपिंग पथक तयार केले आहे. भरतीदरम्यान अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असून भरती प्रक्रियेतूनही त्या उमेदवाराला बाहेर काढले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली.

ठाण्यात ३६४ पुरुष आणि १५७ महिला अशा ५२१ जागांसाठी ३९ हजार ३३८ इतक्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अमली पदार्थ सेवनाला प्रतिबंध करण्यासाठी सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक तयार केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने हे पथक औषध दुकानांत, तसेच साकेत मैदानाच्या परिसरात करडी नजर ठेवणार आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांच्या बॅगांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पोलिस अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी आणि केमिस्ट तसेच ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांचाही  या पथकात समावेश राहणार आहे. 

उमेदवारांची बायोमेट्रिक व मॅन्युअली तपासणी करून त्यांना भरती प्रक्रियेत सोडण्यात येते. अंमली पदार्थाच्या सेवनाचा संशय आल्यास संबंधित उमेदवारांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतील. तसे आढळल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद केले जाईल शिवाय, त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.- दत्तात्रय कराळे, सह. पोलिस आयुक्त, ठाणे शहर

प्रलोभनांना बळी पडू नकापोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. त्यासाठी साकेत येथील मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. शिवाय, या प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंगही केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभन अथवा भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिस आयुक्त जयजित सिंग यांनी केले आहे. तसा फलकही भरती केंद्राच्या बाहेर लावला आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिसpolice parade groundपोलिस कवायत मैदानthaneठाणे