शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

टोलफ्री क्रमांकावरून उडवाउडवीची उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:07 IST

आपत्कालीन कक्षास हस्तांतरित; मीरा-भाईंदरकर त्रस्त

मीरा रोड : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरु करण्यात आलेल्या मीरा भार्इंदर महापालिकेच्या १८००२२४८४९ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना चक्क उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हा क्रमांक हा आपत्कालीन कक्षास हस्तांतरित करण्यात आला असून, तेथील कर्मचाऱ्यांना हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारींसाठी आहे, याची कल्पनाच नाही.बेकायदा होर्डिंग, जाहिरात फलक, कमानी आदींवर कारवाईसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये महापालिकेने १८००२२४८४९ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांच्या तक्रारींसाठी सुरु केला. हा क्रमांक महापालिका मुख्यालयातील दुरध्वनी आॅपरेटर कक्षात होता. त्यानंतर शहरातील वाढत्या डेंग्यू - मलेरीयाच्या लागणमुळे संबंधित रुग्ण, स्वच्छता, डासनाशक फवारणी आदींसाठी पालिकेकडून हाच टोल फ्री क्रमांक देण्यात आला.मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यातील खड्ड्यांवरुन महपालिका आदींची झाडाझडती घेतल्याने खड्ड्यांबाबतच्या तक्रारी करण्यासाठीदेखील शहरातील नागरिकांना हाच टोल फ्री क्रमांक देण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण, फेरीवाले, बेकायदा बांधकामे, पदपथ आदी सर्वच प्रकारच्या तक्रारी एकाच टोल फ्री कमांकावर नागरिकांनी कराव्यात, असा प्रशासनाने निर्णय घेतला. टोल फ्री क्रमांक पालिका मुख्यालयातील दुरध्वनी आॅपरेटर कक्षात असल्याने केवळ कार्यालयीन वेळेत आलेल्या तक्रारींची नोंद व्हायची. अन्यवेळी तक्रारीसाठी फोन करणाºया नागरिकांचे फोन उचललेच जात नव्हते.टोल फ्री क्र मांक २४ तास सुरु ठेवणे आवश्यक असल्याने आॅक्टोबर २०१७ मध्ये सदरचा क्रमांक मीरारोडच्या कनकिया येथील आपात्कालिन कक्षात हलवण्यात आला. सदरचा कक्ष आपात्कालिन सेवेसाठी असल्याने येथे अन्य तक्रारींसाठी संपर्क साधणाºया नागरिकांच्या तक्रारींची नोंद करुन न घेता संबंधित विभागाशी संपर्क करा असे सांगितले जाते. शिवाय टोल फ्रीवर येणाºया तक्रारींची नोंदच केली जात नसून, त्यासाठी नोंद वहीदेखील ठेवलेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांच्या सोयीसाठी सुरु झालेल्या टोल फ्री क्रमांक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.विशेष म्हणजे, पालिकेच्या संकेतस्थळावर हा टोल फ्री क्रमांक खड्डे, बेकायदा जाहिरात फलक, रस्ते, पदपथ, डेंग्यू - मलेरीया साथरोग, किटकनाशक फवारणी, साफसफाई, भुयारी मार्ग, उन्नत मार्ग आदीसाठींच्या तक्रारींकरीता असल्याचे नमूद आहे. तरीही येथे नागरिकांच्या तक्रारींना उत्तर दिले जात नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.टोलफ्री क्रमांकावर सोमवारी सकाळीच तक्रारीसाठी फोन केला असता, हा आपत्कालीनसाठीचा क्रमांक असून संबंधित विभागाच्या आणि प्रभाग अधिकाºयाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करा, असे सांगण्यात आले. पालिका लेखी तक्रारींवरदेखील कारवाई करत नाही आणि टोल फ्रीवर तर तक्रारच घेत नाही.- मनोज राणे, नागरिकनागरिकांना आपल्या समस्या, तक्रारी सहजपणे महापालिकेकडे करता याव्यात म्हणून टोलफ्री क्रमांक असायलाच हवा. न्यायालयानेदेखील तसे आदेश दिले आहेत. फलक व संकेतस्थळावर टोलफ्री क्रमांक देऊनही जर पालिका कार्यवाही करत नसेल तर ते चुकीचे आहे. पालिकेला नागरिकांच्या तक्रारी घेण्यात आणि त्या सोडवण्यात स्वारस्य नाही हेच यातून स्पष्ट होते.- माधुरी तांबे, नागरिक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक