शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या, बदलापुरातून शिवेंद्रसिंह राजेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 05:03 IST

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे

बदलापूर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असे मत आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी रविवारी बदलापुरात व्यक्त केले.सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा महोत्सवाला रविवारी बदलापुरात सुरु वात झाली. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या शिवेंद्रसिंह राजे यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. झाला प्रकार दुर्दैवी आहे. त्याचा बदला घेतलाच पाहिजे. चर्चा पुरे झाली. आता काहीतरी ठोस कारवाई करून दाखवा. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, अशी सर्वांचीच भावना असल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, कुणाचं आरक्षण काढून घ्या, कमी करून घ्या, अशी मागणी आम्ही कधीच केली नव्हती. मराठा समाजातील जे गरजू आहेत, त्यांना नक्कीच आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. आज त्याच मोठ्या भावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे सर्वांनीच या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील महानाट्यच्महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित महानाट्य सादर करण्यात आले. भव्य रंगमंच, भव्य असा किल्ला या महानाट्यासाठी तयार करण्यात आला होता.च् सोबत घोडे, उंट यांची रंगमंचासमोर वर्दळ, युद्धासाठी अनोखा मंच येथे उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास यावेळी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. सोबत, संभाजी राजांचा लढा आणि त्यांचा झालेला अंतही यावेळी दाखवण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी महाराजांचा जयजयकार केला.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेthaneठाणे