शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलानजीक आणखी एक उड्डाणपूल, एमएसआरडीसीचा रेल्वेकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 01:33 IST

कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्याने सध्या होणारी वाहतूककोंडी आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या विचारात घेऊन राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलानजीक आणखी एका उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कल्याणमधील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्याने सध्या होणारी वाहतूककोंडी आणि भविष्यात वाढणारी वाहनांची संख्या विचारात घेऊन राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पत्रीपुलानजीक आणखी एका उड्डाणपुलाचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठवला आहे. त्यासंदर्भात आराखडा मंजुरीसाठीचे नियोजन रेल्वेला २१ जुलैला दिले आहे. मात्र, रेल्वेकडून त्यास अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पत्रीपुलाशेजारीच केडीएमसीने बांधलेला दुपदरी उड्डाणपूल सध्या वापरला जात आहे. मात्र, तो अपुरा पडत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. तर, जुन्या पत्रीपुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचे प्राथमिक काम सुरू आहे. त्यामुळे हा पूल झाल्यानंतर एकूण चारपदरी रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. राज्य रस्ते महामंडळाचा आणखी एक १११ मीटर लांब आणि ११ मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या पुलासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे, असेही महामंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले.जुना पत्रीपूल जेथे पाडला, त्या जागी प्रस्तावित नवा पूल बांधण्याचा अधिकाºयांचा मानस आहे. तर, महापालिकेच्या सध्याच्या पुलाला लागून असलेल्या मोकळ्या नवीन पुलासाठी खोदकाम सुरू आहे, असे सांगण्यात आले. जर नवा पूलही झाला, तर एकूण सहापदरी पूल होतील आणि त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्य अभियंत्यांनी व्यक्त केला.वर्षभरात होणार बांधणी?राज्य रस्ते विकास महामंडळाचा नवीन पुलाचा प्रस्ताव मिळाल्याचे रेल्वे अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.दुसरीकडे या पुलास मध्य रेल्वेने मंजुरी दिल्यानंतर पूल उभारण्यासाठी नियोजन आणि प्रत्यक्ष बांधणी यासाठी वर्षभराचा कालावधी लागेल, असे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी म्हणाले.सध्या ज्या पुलाचा पाया खोदण्याचे काम सुरू आहे, त्या कामात कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली