शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या अनधिकृत निवडणूक जाहिरातप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: May 16, 2024 21:46 IST

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आचार संहितेचे उल्लंघन करून विनापरवानगी भाजपच्या जाहिरात प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल ...

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आचार संहितेचे उल्लंघन करून विनापरवानगी भाजपच्या जाहिरात प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोडच्या जे पी इन्फ्रा मधील इस्टेला इमारतीच्या तळमजल्यावर डी विंग येथील लिफ्टच्या बाजुला एल. ई. डी. स्क्रिन वर गृहनिर्मण संस्थेच्या आवारात भाजपाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकिय जाहीरात चालु होती. त्यावर महायुतीच्या अन्य पक्षांच्या नेत्यांची छायाचित्र व निवडणूक चिन्ह देखील होती . मे. ऍड ऑन मो प्रा.ली. ह्या हैद्राबादचा पत्ता असलेल्या कंपनीने जाहिरात केल्याचे सांगण्यात आले. 

ह्या बाबत ९ मे रोजी आयोगाच्या  सी व्हिजिलंस ऍप वर तक्रार केली गेली होती . आचार संहिता पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केल्यावर राजकीय जाहिरात बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे आढळून आले होते . १४ मे रोजी या प्रकरणी पथकातील महापालिकेचे कनिष्ठ अभियंता यांच्या फिर्यादी वरून काशिगाव पोलीस ठाण्यात विवेक धीरेंद्र शुक्ला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. 

ह्या आधी महामार्गावर होर्डिंगवर विनापरवानगी जाहिरात केल्या बद्दल २१ एप्रिल रोजी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

 

टॅग्स :mira roadमीरा रोडBJPभाजपा