शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला पुन्हा धक्का, शहरप्रमुख दिलीप गायकवाड शिंदे गटात

By सदानंद नाईक | Updated: February 24, 2023 14:26 IST

Ulhasnagar News: शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समर्थकांसह पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रवेश घेतला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समर्थकासह पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी प्रवेश घेतला. सिंधी बहुल शहरात महापालिकेवर सर्वाधिक वर्ष सत्ता ठेवण्यात शिवसेनेला यश आले असून यापुढे शिवसेनेची सत्ता राहण्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी दिली.

उल्हासनगर सिंधी बहुल शहर असलेतरी महापालिकेवर शिवसेनेची सर्वाधिक वर्ष सत्ता होती. शिवसेनेचे गणेश चौधरी, यशस्विनी नाईक, विजया निर्मल, लिलाबाई अशान, अपेक्षा पाटील, राजश्री चौधरी आदीनी महापौर भूषविले आहे. दरम्यान शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सुरवातीला शिंदे गटाला उल्हासनगर मधून विरोध होऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड झाली होती. शिवसेनेचे दोन गट झाल्यावर शिंदे गटाच्या शहरप्रमुख पदी रमेश चव्हाण व राजेंद्र सिंग भुल्लर यांची नियुक्ती केली. तर ठाकरे गटाचे गेली १५ वर्ष शहरप्रमुख राहिलेले राजेंद्र चौधरी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जमीन हडपणे, फसवणूक, खंडणी, अपहरण आदी तब्बल १९ गुन्हे एकाच गुन्हे प्रकरणात दाखल झाल्यावर, चौधरी यांनी गुन्हा होण्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी समर्थकासह पक्ष प्रवेश घेतला. 

शिवसेना ठाकरे गटाने दिलीप गायकवाड व कैलास तेजी यांच्यावर शहरप्रमुख पदाची जबाबदारी दिली. शिवसेना शिंदे गटात गेलेले राजेंद्र चौधरी यांची गेल्या आठवड्यात उल्हासनगर महानगरप्रमुख पदी शिंदे गटात नियुक्ती झाली आहे. उल्हासनगर पश्चिमचे ठाकरे गटाचे शहरप्रमुख दिलीप गायकवाड, माजी नगरसेविका ज्योती गायकवाड, उपशहर संघटक आनंद सावंत यांच्यासह समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत पक्ष प्रवेश घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेंद्रसिंह भुल्लर आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेulhasnagarउल्हासनगर