शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गावठी बॉम्ब प्रकरणात रायगड जिल्ह्यातून आणखी एक अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:15 IST

रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा मोठा साठा ठाणे पोलिसांनी शनिवारी शीळफाटा परिसरातून हस्तगत केला

ठाणे : रानडुकरांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा मोठा साठा ठाणे पोलिसांनी शनिवारी शीळफाटा परिसरातून हस्तगत केला. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी अटक केली.ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१चे सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी शनिवारी गावठी बॉम्बचा मोठा साठा हस्तगत केला. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील रेवसजवळ असलेल्या नौखार मोरपाडा येथील प्रवीण पाटील (३४) याला अटक करून त्याच्याजवळून २ लाख ३२ हजार रुपयांचे २९० गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले होते. शीळ-डायघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या चौकशीतून त्याने बॉम्बचा साठा रायगड जिल्ह्यातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया नारंगी आदिवासी पाड्यातून रमेश पवार (५०) याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. गावठी बॉम्ब बनवण्यासाठी फटाक्यांमधील स्फोटक पदार्थाचा वापर केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने आरोपीला २०० रुपये प्रतिनग याप्रमाणे बॉम्ब पुरवले होते. पवारकडून २९० गावठी बॉम्ब आरोपीने अलिबाग येथून शीळफाट्यापर्यंत बसने आणल्याचेही समोर आले आहे.