शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील मनसेचे शाखाध्यक्ष  जमील शेख यांच्या खून प्रकरणात आणखी एका आरोपीला  अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 20:23 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: आरोपींची संख्या तीन

ठाणे : राबोडीतील महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष  जमील अहमद  शेख  (४९) यांच्या खून प्रकरणात ठाणे  गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट  एकच्या पथकाने हबीब अजमईन शेख (३६, रा. राबोडी, ठाणे) याला रविवारी तब्बल तीन वर्षांनी अटक केली आहे. याच प्रकरणात याअधी दोघांना केली असून यातील एका फरारी आरोपीच्या तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हबीबला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली. 

मनसेचे पदाधिकारी जमील यांची तीन वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडीतील बिस्मील्ला हॉटेलसमोरुन २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरुन जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी जमील यांच्यावर गोळीबार करुन पोबारा  केला होता. गंभीर जखमी अवस्थेतील जमील यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र,  डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद ठाण्यात उमटले होते. 

या गुन्ह्यातील मोटारसायकलस्वार  शाहीद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाºया इरफान शेख याला उत्तरप्रदेशातून अशा दोघांना यापूर्वीच गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. यातील आणखी एक आरोपी ओसामा शेख हा फरार असून त्याच्यासह  मुख्य सुत्रधाराचाही शोध अद्याप लागलेला नाही. ओसामाचा शोध सुरु असतांनाच  युनिट एक या पथकाच्या हाती  हबीब शेख याचाही या खूनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या  पथकाने त्याला २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अटक केली. आरोपीच्या शोधासाठी उत्तरप्रदेशात १९४ दिवस ठाणे पोलिसांचा तळ-महाराष्टÑाच्या अधिवेशनात जमील हत्याकांड गाजल्याने ठाणे पोलिसांसमोर या खूनाचे गूढ उकलण्याचे आव्हान हाते. त्यामुळेच मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकासह खंडणी विरोधी पथकातील २० अधिकारी, ३५ अंमलदारांनी १५ पेक्षा अधिक वेळा उत्तर प्रदेशात फेºया मारल्या. त्यासाठी १९४ दिवस हे पथक त्याठिकाणी तळ ठोकून होते. अजूनही हा तपास सुरुच आहे.