शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची आर्थिक दिवाळखोरी जाहीर करा, श्वेतपत्रिका काढा, विरोधी पक्षनेत्यांचे आयुक्तांना पत्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:49 IST

केडीएमसीची खालावणारी आर्थिक परिस्थिती व वाढती विकासकामे व आस्थापनेवरील खर्च, तसेच दिवसेंदिवस घसरत चाललेला उत्पन्नाचा आलेख याची एकंदरीत माहिती नागरिकांसमोर उघड होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आर्थिक दिवाळखोरी जाहीर करून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण : केडीएमसीची खालावणारी आर्थिक परिस्थिती व वाढती विकासकामे व आस्थापनेवरील खर्च, तसेच दिवसेंदिवस घसरत चाललेला उत्पन्नाचा आलेख याची एकंदरीत माहिती नागरिकांसमोर उघड होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आर्थिक दिवाळखोरी जाहीर करून श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.केडीएमसीला अपेक्षित उत्पन्न होऊ शकलेले नाही, अशी थातूरमातूर कारणे देत पालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमधील नागरी विकासकामांना खो घालण्यात येत आहे. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला बळी पाडण्याचे काम सध्या प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, हे नागरिकांसमोर येण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे हळबे यांचे म्हणणे आहे.महापालिकेचे अंदाजपत्रक हे फुगवलेले आहे. वारंवार मागणी करूनही आठमाही अंदाजपत्रक सादर केलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सत्ताधाºयांनी अंदाजपत्रक फुगवले व प्रशासनाने सत्य समोर आणलेच नाही, असे आरोप-प्रत्यारोप आता दोन्ही बाजूंनी करण्यात येत आहेत. मात्र, खालावलेल्या आर्थिक परिस्थितीची जबाबदारी कोणीही घेत नाही. सत्ताधाºयांच्या दबावापुढे सत्य परिस्थिती दाखवून देण्यात असमर्थ ठरलेले महापालिका प्रशासन यापुढे नागरिकांना दररोज भेडसावणाºया विविध नागरी समस्यांचे निराकरण कसे करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रकल्प एकतर बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत आणि नव्याने प्रकल्प हाती घेणे आर्थिक कुवतीस परवडणारे नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे हळबे म्हणाले....तर आंदोलनाची वेळकचºयाचा प्रश्न, आरोग्यविषयक समस्या, पाणीपुरवठा प्रश्न, जीवघेणे खड्डे, कोलमडलेली परिवहन सेवा, प्रदूषित हवा, अशा एक ना अनेक समस्या आजही कायम आहेत. या कामांचे कंत्राटदार कामाची देयके मिळत नसल्याने त्रस्त आहेत. काही कामे सोडण्याच्या मार्गावर आहेत, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.महापालिका क्षेत्रातील करदात्या नागरिकांना सत्ताधाºयांनी पांघरलेल्या झुलीच्या वास्तवाचे दर्शन व्हायलाच पाहिजे. त्यासाठी केडीएमसीच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दर्शवणारी श्वेतपत्रिका तातडीने काढावी. टाळाटाळ केल्यास नाइलाजाने नागरिकांसोबत नागरी हितासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा हळबे यांनी पत्रात दिला आहे.याबाबत आयुक्तांशी संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला झाला नाही.

टॅग्स :Governmentसरकार