शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या भूमिकेविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:53 IST

केंद्र सरकार भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत; प्रवक्तीच्या वक्तव्याने निर्माण झाला वाद

पालघर : लोकांचा कितीही विरोध असला तरी वाढवण बंदर होणारच, असे संकेत दिले जात असल्याने किनारपट्टीवरील स्थानिकांमधून संतप्त भाव उमटले आहेत. केंद्र शासनाची वाढवण बंदर उभारणीबाबत यापूर्वी केलेली घोषणा आजही ठाम आहे. भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या दाव्यानंतर मोदी सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने तर चालू नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.केंद्र शासनाने वाढवण बंदराच्या प्रोजेक्टसाठी मोठी गुंतवणूक केली असून केंद्राचा ७४ टक्के वाटा तर राज्य सरकारचा यात २६ टक्के वाटा असा सामंजस्य करार झाला असून एकूण ६५ हजार ५४४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यताही देण्यात आली आहे. या बंदरासाठी हजारो एकर जमीन संपादन केले जाणार असून समुद्रात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात भरावासाठी पूर्वेकडील डोंगर फोडावे लागणार आहेत. दुसरा सर्वात मोठा फटका मच्छीमारांना बसणार असून मत्स्य संपदेचा ‘गोल्डन बेल्ट’ समजला जाणारा भागच या भराव क्षेत्रामुळे नष्ट केला जाणार आहे. यामुळे किनाऱ्यावर वसलेल्या धाकटी डहाणू, चिंचणी, दांडापाडा, वरोर, तारापूर, घिवली, कंबोडा, नवापूर, दांडी, सातपाटी आदी गावातील घरावर समुद्री लाटांचा तडाखा बसणार आहे. नरेंद्र मोदींना आम्ही मते दिल्यामुळे ते आज पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. तुमचे सरकार असले म्हणून तुम्ही काहीही करणार का? एके ठिकाणी पेसा कायदा तुम्हीच आणता आणि त्याचे उल्लंघनही तुम्हीच करता? आमच्या भावनांचा विचार करा.    - विनिता राऊत, सरपंच, वाढवणपंतप्रधान हुकूमशहा आहेत का? आम्ही हे बंदर कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.- कुंदन राऊत, पर्यावरणप्रेमी, नरपडस्थानिकांच्या भावना दुखावणारी जाहीर वक्तव्ये सत्तेचा माज असलेलेच करतात. कोणी कितीही चमचेगिरी वक्तव्ये केली तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. जोपर्यंत वाढवण बंदर कायमस्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत असाच लढा यापुढेही सुरू ठेवू.        - अनिकेत पाटील, कार्याध्यक्ष,     वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती

टॅग्स :BJPभाजपा