शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त फेरीवाल्यांची डोंबिवलीत महापालिकेवर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 19:55 IST

आठवडाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला कारवाई विरोधात संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आक्रमक होत महापालिकेवर धडक दिली.

 डोंबिवली - आठवडाभरापासून सुरू असलेल्या फेरीवाला कारवाई विरोधात संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक आक्रमक होत महापालिकेवर धडक दिली.  विशेषतः महिला फेरीवाल्यांचा समावेश असल्याने डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर याना मध्यस्थी करावी लागली . महिलांनी सांगितले की १५० मीटर च्या बाहेर देखील बसल्यावर कारवाई होते . तर मग स्थानक परिसरातच का बसू नये इथे आणि तिथे ही आमचे सामान उचलतायच तर मग बसायचे तरी कुठे असा सवाल करताच वाडेकर निरुत्तर झाले आक्रमक फेरीवाल्याना शांत करताना फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे आणि ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी चरचा केली जर १५० मीटर बाहेर फेरीवाले बसत असतील तर त्यांच्यावर कारवाई करून नये आणि जर १५० मीटर मध्ये बसत असतील तर जरूर कारवाई करा असे कुमावत याना वाडेकर यांनी सांगितले डोंबिवली पश्चिमेला काही फेरीवाल्यांवर नियमानुसार वागून तराजूत तोडण्यात आल्याची घटना कांबळे यांनी वाडेकर याना सांगितली . त्यावर फेरीवाल्यांनी संताप व्यक्त केला . पण त्यात कुमावत यांनी सावध पवित्रा घेत कुमावत यांनी हात वर केले . महापालिका अधिकाऱ्यानच्या दुट्टपी भूमिकेवर आक्षेप घेत फेरीवाला सगळीकडे सारखाच असे स्पष्ट केले . तणावाची परिस्थिती बघता वाडेकर यांनी आयुक्त गोविंद बोडके हेच पर्याय देऊ शकतात त्यामुळे मुख्यालयात जाऊन तेथे दाद मागावी येथे आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल असे वर्तन करू नये अन्यथा पोलीस देखील कार्यवाही करतील अशी तंबी दिल्यावर तणाव शांत झाला . पोट भरणे हा आमचा हक्क नाही का ४० वर्षा पासून आम्ही व्यवसाय करतो तरी आम्हला त्रास का असा सवाल महिलांनी केला तसेच कारवाई करताना जर सामान मिळाले तर त्यावर जागीच दंड घेऊन समान सोडावे अशी मागणी फेरीवाल्यांनी केली . तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी तसाच फतवा काढला होते असे कांबळेनी स्पष्ट केले . तसेच सोमवारी आयुक्त बोडके यांनी दिलेल्या शब्दानुसार जर ऑगस्ट महिना अखेरीस आम्हाला जागा दिली नाही तर फेरीवाला शांत बसणार नाही  याची नोंद महापालिके सह पोलिसांनी घ्यावी असा इशारा कांबळे यांनी दिला.फोटो आहेत

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhawkersफेरीवालेnewsबातम्या