शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:25 IST

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे तीन हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यातजिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार ५० सार्वजनिक नळ बसविण्याची मागणी

ठाणे : वर्तकनगर प्रभागातील म्हाडा वसाहतीमधील इमारती तसेच बैठ्या घरांना गेल्या तीन आठवडयांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेसाठी या परिसरात ५० सार्वजनिक नळ द्यावेत, अशी मागणी जनता दलाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.येथील वर्तकनगर, शिवाईनगर भागातील म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेच्या तानसा आणि वैतरणा या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या ते शुद्ध न करताच पुरवठा होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ तसेच इतर इमारतींमधील सुमारे तीन हजार कुटुंबियांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच येथील नळांना मातीसारखे लाल गढूळ पाणी येत आहे. या दूषित पाण्याच्या प्रादूर्भावामुळे येथील नागरिकांना त्त्वचारोग, सर्दी, खोकला आणि तापाचे आजार वाढले आहेत. यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकालाच विकत पाणी घेणे शक्य नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी किमान ५० सार्वजनिक नळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सुरोसे यांनी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

‘‘ वर्तकनगर म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तानसा वाहिनीतून पाणी पुरविले जाते. सध्या ते वैतरणा वाहिनीवर वळविण्यात आले आहे. त्याला क्लोरिंगचा डोस दिला जात असला तरी ते शुद्ध होत नाही. जी नविन बांधकामे आहेत. त्याठिकाकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पण, जुन्या वसाहतीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याची समस्या आहे. पावसाळ्याचे काही दिवस ही समस्या राहील. त्यानंतर हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.’’अतुल कुलकर्णी, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका.......................

टॅग्स :thaneठाणेwater pollutionजल प्रदूषणmhadaम्हाडा