शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा मोबाइल ‘हॅंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:29 IST

जिल्ह्यातील वास्तव : नेटवर्कची समस्या, मानधन, रिचार्जसाठी पैशांची चणचण

ठाणे :  जिल्ह्यातील गाव, पाडे आणि खेडी आदींमध्ये बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यासह त्यांच्या सुदृढ आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात एक हजार ८५४ अंगणवाडीसेविका काम करीत आहेत. केंद्रातील रोजच्या विविध कामांची नोंद त्यांना मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदवावी लागत आहे. पण  रिचार्जसाठी लागणाऱ्या पैशांची चणचण, नेटवर्कअभावी या सेविकांचा मोबाइल सध्या जिल्हाभर हँग झाल्याचे वास्तव ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

सेविकांना केंद्रात उपस्थित बालकांसह त्यांना वाटप केलेला पोषण आहार, त्यास अनुसरून केलेल्या कामांची व रोजच्या कामांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी मोबाइल ॲपवर त्यांची ऑनलाइन नोंद करीत आहेत. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने खास सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे. या सेविका अल्पमानधनावर इंग्रजीतील सॉफ्टवेअरवर कामांची नोंद करून प्रत्येक दिवसाच्या कामाचा अहवाल प्रशासनाला देत आहेत. या कामासाठी आर्थिक पाठबळ शासनाकडून वेळेवर मिळत नाही. तरीgh त्या मुलांना रोज देण्यात येत असलेल्या पोषण आहार वाटपात खंड पडू देत नाहीत. 

अडचणी काय !गांवपाड्यांना मोबाइल नेटवर्कची  समस्या आहे. मानधनाची रक्कम, मोबाइल रिचार्जसाठी ऑगस्टपासून पैसे मिळालेले नाहीत. या सेविका उच्चशिक्षित नसतानाही त्यांना मोबाइल ॲपद्वारे इंग्रजीतील तक्त्यांमध्ये विविध माहिती भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. 

अंगणवाडीसेविकांना वेळेवर मानधन मिळावे!अंगणवाडीसेविकेला वेळेवर, दरमहा मानधन मिळणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळवून देण्यासाठी व त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमच्या पातळीवर निश्चितच प्रयत्न करतो.    - सुभाष पवार उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

मोबाइलवरून कोणती कामे करावी लागतात?n सर्व घरातील बालके, महिला आणि इतर सदस्यांविषयीची माहिती जतन करणे आणि अद्यावत करीत राहणे.n अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षांच्या बालकांची दैनिक उपस्थिती, दैनदिन उपक्रम. n अंगणवाडी क्षेत्रातील कार्य आणि आहाराचा मोगावा घेत राहणे.n गर्भवती, स्तनदा माता आणि २ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी गृहीभेटीचे नियोजन.n बालकांच्या वजनांची नोंद करणे. वाजवीपेक्षा कमी वजन आपोआप दर्शविणे.n लाभार्थ्यांना भविष्यातील व्हीएचएनडीविषयी सूचना देण्यासाठी लाभार्थ्यांची यादी करणे. व्हीएचएनडी दिवशी लसीकरण डेटाची नोंदणी करणे.nअंगणवाडी सुरू असल्याबाबतची स्थिती, उपस्थिती आणि आहार वितरणाचा शोध घेण्यासाठी फॉर्म. 

टॅग्स :thaneठाणेMobileमोबाइल