शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांचा निवडणुकीच्या कामास गुरुवारपासून विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 05:39 IST

मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत.

ठाणे : मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत. उर्वरित निवडणुकीच्या कामांसह योजनांचे व इतर कोणतेही काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडीसेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अद्यापही मानधन मिळालेले नाही. त्या अर्धपोटी काम करत आहेत. गरीब, कष्टकरी कुटुंबातील या सेविका, मदतनीस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही. मार्च महिन्याचे मानधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहारवाटपाव्यतिरिक्त करावे लागणारे काम गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीच्या कामांसह विविध योजनांची कामे, विविध सभांची भागीदारी, अन्य अहवाल आदी कामे अंगणवाडीसेविका, मदतनीस करणार नसल्याचे महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्तांना दिलेली असूनही मार्चचे थकीत मानधन अजून दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कामबंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहारवाटपाचे काम सुरू ठेवले आहेत. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिठ्ठीवाटप करणे, मतदान केंद्रांवरील पाळणाघराचे काम, मतदान अधिकारी आदी लोकसभा निवडणुकीची कामेदेखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडीसेविका करणार नाहीत, असे बृजपालसिंह यांनी सांगितले.‘१ मे पूर्वी मानधन मिळावे’या निवडणुकीच्या कामाविरोधात न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली आहे. मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वी मिळावे, असा ठोस निर्णय घेतल्याशिवाय निवडणुकीसह कोणतेही कामे करणार नसल्याचे बृजपालसिंह यांनी निदर्शनात आणून दिले. यामुळे लोकसभेच्या मतदान केंद्रांवरील विविध कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक