शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांचा पायी एल्गार मोर्चा 

By नितीन पंडित | Updated: February 23, 2023 19:39 IST

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थाना पर्यंत पायी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

भिवंडी :  अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविकांनी महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या नेतृत्वाखाली शहापूर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थाना पर्यंत पायी एल्गार मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. भर उन्हात या पायी मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मानधनवाढ, दरमहा अर्ध्या मानधनाएवढी पेन्शन,ग्रॅच्युईटी, सुसज्ज अंगणवाडी केंद्र, पूरक पोषण आहाराच्या दरात वाढ, कार्यक्षम मोबाईल व मराठी पोषण ट्रॅकर अॅप,सेवानिवृत्ती लाभ, इतर भत्ते, केंद्राचे भाडे, परिवर्तन निधी थकीत निधी देणे या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या असून त्यासाठी अंगणवाडी सेविका लढा देत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंग यांनी दिली आहे.

या एल्गार मोर्चात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी ब्रिजपाल सिंग, भगवान दवणे,गुलाब वरकुटे,अपर्णा पानसरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा पदयात्रा महिला मोर्चा गुरुवारी भिवंडी तालुक्यात दाखल झाला असून पडघा येथे दुपारच्या मुक्कामा नंतर रात्री दापोडा येथे मुक्काम करून शुक्रवारी हा मोर्चा सकाळी ठाण्यात धडकणार आहेत. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी