शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेबरपासून रखडलेल्या मानधनासाठी अंगणवाडी सेविकांचा ठाणे जि.प.वर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 19:11 IST

ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या ...

ठळक मुद्दे जिल्हा भरातील सेविकांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला.मोर्चा पोलिस आयुक्तालयापासून पुढे शासकीय विश्रामगृहासमोर आडवण्यात आलाकोण म्हणतो देणार नाय... घेतल्या शिवाय राहणार नाय

ठाणे : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नोव्हेंबरपासून रखडलेल्या मानधनासाठी व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सुरू असलेली उपासमार, आर्थिक समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधन्यासाठी हा मोर्चा काढून सेविकांनी ठाणेजिल्हा परिषदेच्या प्रशासनास धारेवर धरले. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची भेट घेऊन मोर्चेकर सेविकांनी मागण्याचे निवेदन दिले.      महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरातील सेविकांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढला. महागिरी येथून निघालेला हा मोर्चा पोलिस आयुक्तालयापासून पुढे शासकीय विश्रामगृहासमोर आडवण्यात आला. या मोर्चाचे येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी या कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी उपस्थित सेविकांना मार्गदर्शन केले. प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर झाल्याच पाहिजे,यासाठी ८ जानेवारीच्या देशपातळीच्या संपात सहभाग घेऊन मंत्रालयावर धडक देण्याचेही पाटील यांनी सेविकांना सांगितले. या नवीन सरकारमधील महिला बालविकास मंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय जागेवरून हटणार नसल्याचा निर्धारही पाटील यांनी सेविकांच्या तोंडून वळवून घेतला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह, राजेश सिंह यांनीही उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले.       यावेळी सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून या मोर्चात सहभाग घेतला होता. मागण्या मान्य झाल्यास पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय... खाली मुंडके वर पाय, कोण म्हणतो देणार नाय... घेतल्या शिवाय राहणार नाय आदी घोषणा देत सेविकांनी शासकयी विश्रामगृह समोरील परिसर दणाणून सोडला. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेत काम करणाऱ्या सर्व सेविकांना शासकीय दर्जा द्या,मानसेवी असे गोंडस नाव देऊन सेविकांकडून अल्पशा मानधनावर काम करून घेतल्या जात असल्याचा अन्याय तत्काळ दूर करा,नोव्हेबरपासून रखडलेल्या मानधनाची रक्कम तातडीने अदा करावी, सेविकांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी प्रत्येक महिन्या एक तारखेला मानधन द्या, सेविकेला तृतीय श्रेणी व मदतनीसला चतुर्थ श्रेणीचे वेतन व सेवेचे फायदे द्या. मानधनात भरघोस वाढ करा, निवृत्तीच्या दिवशी मिळालेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन देण्याचा निर्णय घ्या, आजारपणाची रजा लागू करा,लाभार्थ्यांच्या आहारचे पैसे अ‍ॅडव्हान्स द्या आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेला यावेळी देण्यात आले.

 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद