शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनविद्या मिशनमध्ये ‘आनंद मेळावा’; सद्गुरू श्री वामनराव पै यांची जन्मशताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 07:18 IST

समारंभाचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. 

कर्जत : सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारपासून जीवनविद्या मिशनमध्ये ‘आनंद मेळाव्या’चा प्रारंभ करण्यात आला. २०२२-२०२३ हे वर्ष सद्गुरू वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.  कर्जत येथील सुखाचे प्रवेशद्वार असलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समारंभाचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाद पै यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. 

जीवनविद्या मिशनचे ज्येष्ठ प्रबोधक आणि माजी विश्वस्त शिवाजीराव पालव तसेच माजी विश्वस्त आणि ज्येष्ठ नामधारक विश्वासराव देशपांडे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान झाले. जीवनविद्या मिशनने महाजन यांचा सत्कार केला.

महाजन यांनी जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा विचार अतिशय भावला, असे देखील ते म्हणाले. वैभव निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. जीवनविद्या मिशनचे तत्त्वज्ञान आणि श्री सद्गुरूंच्या आशीर्वाद यामुळे स्पर्धा परीक्षा पास होणे आणि तो संपूर्ण प्रवास सहज शक्य झाला, असे सांगून त्यांनी सद्गुरूंनी सांगितलेले सात ‘क’ त्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे ठरले हे अनुभव बोल व्यक्त केले.

युवा नामधारक सिद्धेश नारकर हा जागतिक कॅलेस्थॅनिक स्पर्धेत यश संपादन केले. त्याबद्दल प्रल्हाद वामनराव पै यांनी कौतुक केले. जीवनविद्या ही मानसिक अंपगत्वावर पूरक उत्तर असल्याचे सांगितले. जीवनविद्या मिशन गेली अनेक वर्षे समाजसेवेच कार्य करत आहे.  हे वर्ष जन्मशताब्दी वर्षे म्हणून साजरे केले जाणार आहे. म्हणून प्रत्येक नामधारकाने ऑफिस, घर आणि समाजसेवेचे कार्य करत असताना प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची हा संदेश लक्षात ठेवून कार्य करावे, असे मार्गदर्शन यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांनी केले. याप्रसंगी दीपस्तंभ फाउंडेशनचे अध्यक्ष यजुवेंद्र महाजन, आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Karjatकर्जतMaharashtraमहाराष्ट्र