शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा नसलेल्या वृद्ध पित्याच्या पार्थिवावर मुलींकडून अंत्यसंस्कार, मुखाग्नीही दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 15:04 IST

भिवंडी शहरातील नारपोली या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर व विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता.

नितिन पंडीत

भिवंडी - मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे परक्याचे धन या उक्तीप्रमाणे समाज आजही वावरत असताना भिवंडीत मुलगा नसलेल्या गणपत कृष्णा भोईर या ८७ वर्षीय वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिन्ही मुली पुढे सरसावल्या. मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीपासून त्यांचा व्हिडीओ देखील शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.           भिवंडी शहरातील नारपोली या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर व विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. परंतु डोक्यात ताप शिरल्याने मुलगा गणेश मानसिक व्याधीने वयाच्या २५ व्या वर्षी त्याचे निधन झाले. तेव्हा पासून काबाडकष्ट करणाऱ्या गणपत भोईर यांनी सुषमा, सुलोचना, शिल्पा या तिन्ही मुलींना मोठं करून त्यांचे विवाह चांगल्यास्थळी करून दिले.              वय वाढत गेले तसे कष्ट झेपत नसल्याने वार्धक्यात घरीच असलेल्या आईवडिलांचा सांभाळ तिन्ही मुली करीत असताना कधी तिन्ही मुलींकडे हे दाम्पत्य वास्तव्य करुन गुजराण करीत होते. वार्धक्याने गणपत भोईर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. गणपत काका म्हणून ओळखले जाणारे गणपत भोईर यांनी आपल्या हयातीत अनेकांचे संसार बसविण्याचे काम केले. परंतु त्यांच्या वृद्धपकाळात गरिबीमुळे अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याची खंत मुलींनी व्यक्त करत अखेर मुलींनीच तिरडीला खांदा देण्याचा, अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

          सुलोचना, शिल्पा यांनी तिरडीला खांदा दिला तर मोठी मुलगी सुषमा हिने तिरडी समोर शिदोरी धरीत स्मशानभूमीत मृतदेहास अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यावेळी उपस्थित सर्वांनी स्वागत करीत मुलगा-मुलगी हा भेद मानणाऱ्या व स्वार्थासाठी नाती जोपासणाऱ्या समाजाला चपराक लगावली असल्याची प्रतिक्रिया दिली. मुलींनी ही कृती करूनच न थांबता आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कारप्रसंगी घेतली,त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेWomenमहिला