शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

ठाण्यात नवमतदारांच्या संख्येत ४० हजारांची भर, एकूण संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 09:20 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील मतदारयादीमध्ये १२ जानेवारीपर्यंत आणखी ४८ हजार ४७१ मतदारांची वाढ झाली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६३ लाख ४३ हजार ८८९ मतदारांची नोंद झाली होती. त्यानंतर ही मोहीम पुढेही सुरू राहिली होती. त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या ६३ लाख ९२ हजार ३६० नोंद झाली आहे. नवमतदारांमध्ये सुमारे ४० हजारांची भर पडल्याचे दिसून आले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी १८ विधानसभा मतदारसंघाची एकत्रिकृत प्रारूप मतदारयादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे मध्यवर्ती कार्यालय (उढर), सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे.

स्त्री-पुरुष मतदारपुरुष मतदारांची संख्या ३४ लाख ४९ हजार ४९०, स्त्री मतदारांची संख्या २९ लाख ४१ हजार ६४२, इतर मतदारांची संख्या १ हजार २२८ एवढी नोंद झाली आहे. त्यातही मतदार नोंदणीमध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार १३० वरून ६९ हजार ७२० एवढी झाली आहे.

१८ ते १९ गट दरम्यान, ५ जानेवारी रोजी महिलांचे प्रमाण (जेंडर रेशो) - ८४५ होते. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांचे प्रमाण ८४८ इतके झालेले आहे. त्यानंतर आता हाच रेशो ८५२ एवढा झाला आहे. जिल्ह्यातील १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या ६९ हजार ७२० इतकी झाली आहे. 

तृतीयपंथींची नोंदणीदिव्यांग मतदार नोंदणी ३२ हजार २१९ इतकी आहे. तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १,२२८ तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणे