शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:44 IST

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे शहापूरकरांचे लक्ष लागून आहे.या नियोजित धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील सुमारे २०० गावपाड्यांची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता होईल, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे असतानाच, शहापूरच्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे २०० गाव-पाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. याचे वास्तव शहापूरच्या गावखेड्यांना भेटी दिल्यानंतर डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या दौºयाप्रसंगी खर्र्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे आणि भरत पांढरे यांनी या अमृतकुंभ जलसागर धरणाच्या प्रस्तावाकडे डावखरे यांचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून त्यांनी या धरणासाठी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे.शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडील घाटनदेवी माता मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यांमधील पाच ते सात दºयांच्या परिसरात धरण बांधता येणार आहे.प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्याने गुरु त्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा होईल. प्रस्तावित धरणाची जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही.>साखरोली, मानिवली धरणातील गाळ उपसण्याची गरजशहापूर तालुक्यातील साखरोली व मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील धरणांमध्ये गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. गाळ काढण्याबरोबरच दोन्ही तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास परिसराला चांगला पाणीसाठा होण्याबरोबरच विहिरी व विंधण विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातील गाळ काढण्यासह खोली तसेच रुंदीकरणासाठी डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले.>टंचाईमुक्त होणारा परिसर : शहापूर तालुक्यातील खर्डी, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, अजनूप, शिरोळ, वरस्कोळ, दहिगाव, पळशीण, आटगाव, भोसपाडा, आंबिवली, टेंभा, बेलवड, धामणी, जरंडी, गोलभण, दळखण, बिरवाडी, चांदे, कानविंदे, पेंढरघोळ, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसराची प्रस्तावित धरण झाल्यास पाणीटंचाईतून मुक्तता होऊ शकेल.