शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या संपाचा बदलापूरकरांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:07 IST

ग्राहक दहा तास अंधारात : कर्मचाऱ्यांचा आडमुठेपणा, क्षुल्लक कारणामुळे बिघाड

बदलापूर : सलग तीस तासांच्या पाणीकपातीमुळे त्रस्त असलेल्या बदलापूरकरांच्या त्रासात सोमवारी महावितरणाच्या संपाची भर पडली. बदलापूर पश्चिमेतील जवळपास दीड लाख नागरिकांना सोमवारची रात्र अंधारात काढावी लागली. रात्री साडेदहाच्या सुमारास झालेला क्षुुल्लक तांत्रिक बिघाड संपावर असलेल्या कर्मचाºयांनी दुरूस्त न करता थेट पहाटेपर्यंत वाट पाहिली. त्यामुळे महावितरणाच्या कर्मचा-यांविरूद्ध बदलापूरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बदलापूर आणि अंबरनाथमध्ये या आठवडयापासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारच्या पहाटे पाणी येणार नसल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण होते. त्यात सोमवारी सुरू झालेल्या महावितरणाच्या कर्मचाºयांच्या संपाचा बदलापूरकरांना फटका बसला. बदलापूर पश्चिमेत सायंकाळी सात ते आठ आणि पुढे साडेदहानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी साडेआठ पर्यंत सुरळीत झाला नव्हता. ऐन झोपेच्यावेळी खंडीत झालेल्या या वीजपुरवठयाबाबत तक्र ार करण्यासाठी असलेला दूरध्वनी बंद असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत होती. सकाळीही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली होती. अखेर साडेआठच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.च्मोरिवली येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती नंतर महावितरणचे अभियंते देत होते.च्मात्र यामुळे तब्बल दहा तास दीड लाख बदलापूरकर अंधारात होते. तर बदलापूर पूर्वेतल्या औद्योगिक क्षेत्रालाही याचा फटका बसला. क्षुल्लक दुरूस्तीचे काम न केल्यामुळे संपूर्ण रात्र बदलापूरकरांना अंधारात काढावी लागली. 

टॅग्स :thaneठाणे