शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By नितीन पंडित | Updated: February 9, 2023 16:48 IST

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले ...

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय कोणार्क आर्केड येथे बनविण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन देखील प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर ही लोकोपयोगी सेवाभावी कामे सुरूच राहणार असून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले असल्याची माहिती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्र रात्र भर जागून राज्यातील नागरिकांची सेवा करीत आहेत त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात सेवाभावी कार्यक्रम आयोजित केली असून लोकसेवा आठवडा सर्वत्र राबविला जात असून जनसामान्यांना आवश्यक असलेले लोकोपयोगी कामे जिल्ह्यात सुरू असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण त्याचाच एक भाग आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

या कार्यक्रमा प्रसंगी आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी सभापती सदस्य व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे