शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथचा काकोळे पूल धोकादायक, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:02 IST

अपघाताची भीती : नवीन पूल उभारण्याची स्थानिकांची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडणारा आणि काटई नाका ते कर्जतकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील काकोळे गावचा पूल धोकादायक झाला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याठिकाणी नवीन पूल उभारावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

काटई नाक्यावरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग हा अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडला आहे. या एमआयडीसीजवळ काकोळे गाव असून, राज्य महामार्गावरून काकोळे वळणावर उभारलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाखालून वालधुनी नदी वाहत असून,हा पूल कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या राज्य महामार्गाचे काम करताना कर्जत दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पूल उभारण्यात आला असून,काटई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल अजूनही तसाच ठेवण्यात आला आहे. 

वास्तविक,या पुलाचीही नव्याने उभारणी करणे गरजेचे होते. मात्र,निधीअभावी या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तो धोकादायक ठरवावा आणि त्या ठिकाणी नव्याने पूल उभारावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. जर वाहतूक सुरु ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सळ्या गंजल्या, काँक्रिटचा थर निखळला राज्य महामार्गावरील वालधुनी नदीवरील हा पूल महत्त्वपूर्ण असून,त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वेळीच नवीन पूल उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. या पुलावरील लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजल्या असून,अनेक ठिकाणी काँक्रिटचा थर निखळून पडला आहे. या पुलावर अनेकवेळा अपघात घडले असून, ते टाळण्यासाठी नवीन पूल बांधणे हा एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :thaneठाणे