शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अंबरनाथमधील नागरिक त्रस्त : वीज, पाण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:03 IST

अंबरनाथमधील नागरिक त्रस्त : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

अंबरनाथ : बदलापूरमध्ये नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. तसेच शहरातील पाण्याचे वितरण करताना जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मंगळवारी महावितरण आणि पाण्यासाठी मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान पावसाने हजेरी लावल्यावरही शिवसैनिकांनी भर पावसात मोर्चा काढला.

बदलापूरमध्ये वर्षभरापासून पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी पाणीपुरवठा सुरळीत करत नाहीत. अनेक ठिकाणी लहान जलवाहिन्या असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. नियमित होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूरमध्ये महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाविरोधात मोर्चा काढला. यावेळी मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

रमेशवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. जीवन प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकला. त्याचठिकाणी महावितरण विभागाच्या अधिकाºयांनाही बोलावले. यावेळी अधिकाºयांशी चर्चा करताना नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी वितरण व्यवस्थेत अडचणी येत आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने या ठिकाणी जनरेटरची सोय करावी अशी मागणी केली.शहरासाठी अतिरीक्त ३० दशलक्ष लिटर पाणी उचलून त्यातून शहरात पाणी पुरवठा करावा, नवीन वडवली, हेंद्रेपाडा, बेलवली, शिरगांव, माणकिवली या भागात नवीन जलकुंभ उभारणे, पाणीपुरवठा करताना कामचुकारपणा करणारे अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करणे, पाण्याचे दर कमी करणे, पाणी न देता थेट बिल देणाºयांवर कारवाई करणे, ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे त्या ठिकाणी त्वरित सुरळीत पाणीपुरवठा करणे, बेकायदा जोडण्या अधिकृत करणे आणि अमृत योजनेतील कामाची निविदा काढून त्याचे काम त्वरित करणे अशी मागणी यावेळी केली. अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, शहरप्रमुख वामन म्हात्रे, ग्रामीण तालुकाध्यक्ष बाळाराम कांबरी, गटनेते श्रीधर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाते.दरम्यान, या आंदोलनानंतर पाणीपुरवठा वितरणात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.भोंगळ कारभाराने कामकाज ठप्पच्उल्हासनगर : भोंगळ कारभारामुळे पालिकेचे कामकाज ठप्प पडले असून त्याच्या निषेधार्थ मागील आठवड्यात तीन मोर्चे काढले. तसेच सामाजिक संस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन पावसाळयात पाणीटंचाई, कचºयाचे ढीग, खड्डे, विविध विभागातील सावळागोंधळ, कबरस्तान आदी समस्यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला. सोमवारी कॅम्प नं-५ येथील नागरिकांनी पाणीटंचाई, रस्त्याची दुरवस्था याच्या निषेधार्थ मोर्चा काढून समस्यांचा पाढा वाचला. विविध समस्यांवरून बेमुदत उपोषण सुरू आहे.च्सावळागोंधळाने हैराण झालेल्या आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीचे अधिकार प्रभाग अधिकाºयांना दिले आहेत. तसेच मालमत्ता कर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्याही प्रभाग समिती कार्यालयात केल्या आहेत. प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्त महापालिकेत नसल्याने कनिष्ठ कर्मचारी व लिपिक दर्जाचे अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत व गणेश शिंपी यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा प्रभारी पदभार दिला. अशा कनिष्ठ कर्मचाºयांच्याखाली काम करण्यास तयार नसल्याने अन्य अधिकारी, कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.वर्षभरात भाजपाकडून नागरिकांची फसवणूक; शिवसेनेने गाजर वाटून केला निषेधमीरा रोड : मीरा-भार्इंदर शिवसेनेतील महत्त्वाच्या पदांवर काहींच्या कार्याचा आढावा न घेता झालेल्या नियुक्त्या, महापालिकेत विरोधीपक्षात असूनही बहुतांश नगरसेवकांचे मौन यावरून सेनेतील अंतर्गत तक्रारींचा सूर ‘लोकमत’ने मांडल्याने खळबळ उडाली असतानाच मंगळवारी सेनेचे पदाधिकारी व नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसले. भाजपा सत्तेची वर्षपूर्ती साजरी करत असताना शिवसेनेने महापालिका मुख्यालयाबाहेर नागरिकांना गाजर वाटून भाजपाच्या फसव्या आश्वासनांचा निषेध नोंदवला. मीरा- भार्इंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर येऊन मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, विरोधी पक्षनेते राजू भोईर, दिनेश नलावडे, तारा घरत, दीप्ती भट, प्रवीण पाटील, नीलम ढवण, जयंती पाटील, भावना भोईर, स्नेहा पांडे, अनंत शिर्के, वंदना पाटील, कमलेश भोईर आदी नगरसेवकांसह उपजिल्हा संघटक निशा नार्वेकर, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम यांनी पालिका मुख्यालयाबाहेर भाजपाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत नागरिकांना गाजर वाटले. महापौर डिंपल मेहता यांची गाडी अडवण्याचा व त्यांना गाजर देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या महिलांनी केला. भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षभरात शहराची दुरवस्था झाली आहे. निवडणुकीत दिलेली २४ तास पाणी, मेट्रो, चांगले रस्ते, भ्रष्टचारमुक्त पारदर्शक कारभार, चांगली परिवहन सेवा आदी सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत, असे सेनेने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका