शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नाला नव्हे, चक्क डम्पिंग ग्राउंड, अंबरनाथमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:29 IST

अंबरनाथ नगरपालिकेपासून १० मीटर अंतरावर स्टेशन रोडवरील मुख्य नाला हा सर्वांचे लक्ष वेधत आहे. कारण, या नाल्यातूनच पाणी कमी कचरा जास्त वाहत आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेपासून १० मीटर अंतरावर स्टेशन रोडवरील मुख्य नाला हा सर्वांचे लक्ष वेधत आहे. कारण, या नाल्यातूनच पाणी कमी कचरा जास्त वाहत आहे. स्टेशन परिसरातील सर्व व्यापारी आपल्या दुकानातील कचरा घंटागाडीत न टाकता थेट मुख्य नाल्यातच टाकत आहे. त्यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. तर, नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिका कोणतीच ठोस कारवाई करताना दिसत नाही.अंबरनाथ रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नाल्यावर ५० वर्षांपूर्वीचा पूल आहे. या पुलाचे पाच वर्षांपूर्वी मजबुतीकरण करून ठेवले आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील सर्व लहानमोठे नाले हे याच नाल्यात एकत्रित होत असतात. विम्कोनाक्यापासून ते सर्कस ग्राउंडमार्गे हा नाला स्टेशन परिसरात येतो. या नाल्याशेजारीच अनेक दुकाने आहेत. या नाल्यात अतिक्रमण करून अनेक दुकानेही थाटली आहेत. दिवसागणिक हा नाला अतिक्रमणामुळे अरुंद होत आहे. आता त्यात या नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यातही येत आहे. या नाल्यात १२ महिने पाणी असते. त्यातच पावसाळ्यात हा नाला भरून वाहत असतो.स्टेशन परिसरातील नाला महत्त्वाचा असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. स्टेशन परिसरातील या नाल्यात आता स्थानिक व्यापारी आपल्या दुकानातील सर्व कचरा थेट नाल्यात टाकतात. अंबरनाथ पालिकेने सर्व व्यापाºयांना कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र डबे पुरवले आहे. मात्र, या डब्यातील कचरा घंटागाडीत न टाकता तो थेट मुख्य नाल्यात टाकण्याचे काम केले जाते. सकाळी ८ पासून ते १० पर्यंत सर्व व्यापारी याच नाल्यात कचरा टाकत असतात. स्टेशन परिसरातील कचरा उचलण्यासाठी पालिकेने घंटागाडीची सोय केलेली असतानाही व्यापारी मात्र हा कचरा थेट नाल्यात फेकतात. नाल्यात साचलेल्या कचºयामध्ये सर्वाधिक कचरा हा कपड्यांचे बॉक्स, पिशव्या, चिंध्या आणि थर्माकोल यांचा आहे.स्टेशन परिसरातील दुकानदारांचा बेशिस्तपणा येथेच थांबलेला नाही. स्टेशन परिसरातील हॉटेलचालक आणि फेरीवालेही सर्व कचरा थेट याच नाल्यात टाकतात. नाल्याशेजारीच असलेला फळविक्रेतादेखील आपल्याकडील सर्व कचरा नाल्यात टाकतो. शेजारी असलेले सर्व हॉटेलचालकही दुकानातील सर्व घाण आणि वाया गेलेले अन्न नाल्यात फेकून देतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे स्टेशन परिसरातील नारळविक्रेता हा पाणी संपलेले नारळ थेट नाल्यात फेकत असल्याने त्याचा खच पडला आहे.स्टेशन परिसरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या रस्त्यावरील नाल्यातदेखील ही परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेचे अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. स्टेशन परिसरातील मुख्य नाल्याची ही अवस्था असेल तर शहरातील इतर नाल्यांची अवस्था काय असेल, याची कल्पना न केलेली बरी.स्टेशन परिसरातील नाल्यातील कचºयाचे छायाचित्र काढून त्याची तक्रार पालिकेच्या आॅनलाइन तक्रार यंत्रणेकडे पाठवल्यावर पालिकेने दिलेले उत्तरही संतापजनक आहे. कचरा पडलेला असतानाही तक्रारीचे निवारण न करता पालिकेने हा कचरा थेट पावसाळ्यापूर्वी नालेसफाईदरम्यानसाफ केला जाईल, असे स्पष्ट करून आपली जबाबदारी झटकली आहे.स्वच्छतेसाठी एकीकडे अधिकारी झटत असताना काही अधिकारी आलेल्या तक्रारीला गांभीर्याने घेत नसल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे. आलेल्या तक्रारींची लागलीच दखल घेऊन त्या भागाची स्वच्छता करणे अपेक्षित असताना पालिका मात्र आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे. पालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.व्यापाºयांकडूनच होतेय नियमांचे उल्लंघनदुसरीकडे स्टेशन परिसरातील सर्व व्यापाºयांना कचरा संकलित करून तो कचरा घंटागाडीतच टाकण्याच्या सूचना असतानाही हे व्यापारी थेट कचरा नाल्यात टाकत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पालिकेने जातीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुख्य नाल्यासोबत भाजी मंडई येथील नाल्याची आणि बांगडीगल्ली येथील नाल्याचीदेखील तीच अवस्था असल्याने नाला हा व्यापाºयांसाठी मिनी डम्पिंग ग्राउंड झाले आहे. पालिकेने वेळीच या नाल्यांची सफाई न केल्यास शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे बोलले जात आहे.नाल्यातील सर्व कचरा लागलीच उचलण्याचे काम केले जाईल. तसेच यापुढे नाल्यात कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना दिले आहे.- देविदास पवार, मुख्याधिकारीसर्वात आधी नाल्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यानंतर, स्टेशन परिसरातील सर्व व्यापाºयांना कचºयाच्या संकलनाविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यानंतरच कचरा टाकणाºयांवर कारवाई करणे गरजेचे आहे.- प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या