शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमराठींनाही आपले म्हणा, सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 03:36 IST

डोंबिवली : परप्रांतियांविरोधात आंदोलने करून ज्या कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरे चर्चेत आले, तेथेच त्यांनी अमराठी नागरिकांच्याही संपर्कात रहा, असा सल्ला देत नेते आणि पदाधिका-यांना आश्चर्यचकीत केले.

डोंबिवली : परप्रांतीयांविरोधात आंदोलने करून ज्या कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरे चर्चेत आले, तेथेच त्यांनी अमराठी नागरिकांच्याही संपर्कात रहा, असा सल्ला देत नेते आणि पदाधिका-यांना आश्चर्यचकीत केले.अकार्यक्षम पदाधिकाºयांमुळे कल्याण-डोंबिवलीत संघटनेची घसरण होते आहे. तसेच नव्या चेह-यांना संधी मिळत नाही, अशी तक्रार पदाधिकाºयांनीच केल्याने मनसेत लवकरच फेरबदल केले जातील, असे आश्वासन पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिले. नवी पिढी, त्या पिढीतील मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सोशल मीडियात अ‍ॅक्टिव्ह व्हा, असा सल्लाही त्यांनी नेते, नगरसेवक, पदाधिकाºयांना दिला.राज ठाकरे दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवलीच्या दौºयावर आहेत. त्यांनी शुक्रवारी डोंबिवलीतील पदाधिकारी आणि नगरसेवकांशी चर्चा केली. पालिकेतील नगरसेवकांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या आणि प्रशासनाकडून कामे होत नसल्याचे गाºहाणे मांडल्यावर कल्याण-डोंंबिवलीच्या प्रश्नांबाबत शनिवारी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फुटून शिवसेनेत गेल्याच्या पार्श्वभूमीवर राज यांच्या दौºयाला महत्व आले. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे त्यांचा दौरा एक दिवस उशिरा सुरू झाला. डोंबिवली जिमखान्यात शुक्रवारी सकाळी ते आले. त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे होते. नंतर ते शाखाध्यक्ष आणि गट अध्यक्षांच्या बैठकीला गेले. या बैठकीला अन्य पदाधिकाºयांसह माध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश नव्हता. बैठकीत राज यांनी पक्षवाढीबाबत मार्गदर्शन केले. नंतर नगरसेवक आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाºयांची एकत्र बैठक त्यांनी जिमखान्यात घेतली.>पाहिला क्रि केटचा सरावठाकरे यांचे जेव्हा जिमखान्यावर आगमन झाले तेव्हा मैदानात लहान खेळाडुंचा क्रिकेटचा सराव सुरू होता. तो त्यांनी पाहिला आणि त्याची छायाचित्रेही मोबाईलमध्ये काढली.>नव्या पिढीसाठी काम करा स्मार्टपणाने!ठाकरे यांनी पक्षाच्या अवस्थेबद्दलची कारणे जाणून घेतली. आपण कुठे कमी पडतोय? याचीही मीमांसा झाली पाहिजे असे सांगताना नगरसेवकांची कामे कशी सुरू आहेत, ते आणि पदाधिकारी तुमच्या संपर्कात आहेत का? असेही विचारले. आंदोलने करताना गुन्हे दाखल होणार नाहीत, एवढे स्मार्ट व्हा, असा सल्लाही नेत्यांना दिला.मोठमोठया लाटा येतात आणि जातात, पण बाळासाहेब नेहमी सांगायचे... अशा काळात दीपस्तंभासारखे उभे राहायचे. डगमगायचे नाही. त्याप्रमाणे मी आज उभा आहे. तुम्हीही रहा, असा सल्ला ठाकरे यांनी दिला. तुमची जी समाजात ओळख आहे तीच पक्षाची आहे. तसा जनसंपर्क ठेवणे गरजेचे आहे. निवडणुकांपुरते काम करू नका. आजची पिढी स्मार्ट आहे तिच्याप्रमाणे काम करा, असे ते म्हणाले. इंदिरा गांधी यांचे सरकार पडल्यानंतरही त्या पक्षाला नव्याने उभारी आली, याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.>आयुक्तांना भेटणारपदाधिकारी आणि नगरसेवकांच्या समस्या जाणून घेताना पालिकेची बिकट अवस्था, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेल्या साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजची वस्तुस्थिती आणि विकासकामांबाबत आयुक्तांकडून सहकार्य मिळत नसल्याचे मुद्दे महिला नगरसेवकांनी मांडले. अर्थसंकल्प कसा फुगवलेला आहे, हे त्यांना सांगण्यात आले. नगरसेवकांची गाºहाणी ऐकल्यानंतर ठाकरे यांनी सीएसआर फंडातून काही कामे करावी, असे सुचवले. शिवाय शनिवारी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>कोट यांना क्लीन चिटशिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग अध्यक्षपद पदरात पाडून घेतलेल्या सुनंदा कोट याही बैठकीला उपस्थित होत्या. त्यांच्याबाबतीत ठाकरे अथवा अन्य पदाधिकाºयांनी कोणतेही भाष्य न केल्याने त्यांना किलन चीट मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू होती.>‘नगरसेवक फुटण्याची भीती मला नाही’कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक फुटतील, अशी भीती मला नाही. ती तुम्हाला असेल. त्यासाठी मी आलेलो नाही, असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मी येणार म्हणून शिवसेनेच्या महापौरांनी रातोरात उभे राहून खड्डे बुजवले. त्यामुळे मी अधूनमधून यायला हरकत नाही, असा टोला लगावत त्यांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आर्थिक स्थितीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीचे ६,५०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची थाप मारणारे मुख्यमंत्री सारखे पॅकेज जाहीर करत सुटले आहेत. लोकांना मुर्ख बनवण्याचा धंदा सुरू आहे. त्यासाठी पैसा कुठे आहे? हा काय साखरपुडा आहे का? मुर्ख बनवायलाही मर्यादा आहे की नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRaj Thackerayराज ठाकरे