शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 18:06 IST

अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ: अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाच्या कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना वीज वितरण विभागामार्फत वाढीव बिल देण्यात येते, चुकीचे बिल देऊन ग्राहकांची लूट केली जाते, कार्यालयात येणा-या ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचे काम केले जाते, असे आरोप करीत सोमेश्वर यांनी हे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये वीज बिलातील स्थिर आकाराच्या नावावर केलेली वाढ रद्द करणे, मुंबईत खासगी वीज कंपनी स्वस्त वीज विकत आहेत, तर शासनाची यंत्रणा असताना अंबरनाथच्या ग्राहकांना महाग दराने वीज घ्यावी लागत असल्याने या भागातील विजेचे दर कमी करणे, वीजबिलांचे वाटप वेळेवर होत नसल्याने नागरिकांना दंडात्मक रक्कम भरावी लागत असल्याने त्यातील त्रुटी कमी करणे, तक्रार घेऊन येणा-या नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.योग्य प्रकारे काम केले जात नाहीत, वीजबिल न भरल्यास 2 महिन्यांत वीज जोडणी तोडण्याची तरतूद आहे. सोबत एक नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र अंबरनाथ शहरात एका महिन्याचे बिल भरले गेले नाही तर थेट वीज जोडणी तोडण्याचे काम केले जाते. जोडणी तोडल्यावर पुन्हा त्याची जोडणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक व्यवहार करतात.  सर्वसामान्य नागरिकांना होणा-या या त्रासाची दखल घेत स्वाभिमान संघटनेच्या पुढाकाराने उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यात विकास सोमेश्वर, विशाल सोनावणे, अ‍ॅड. अमोल वाजे, लखन चौहान, गुरू चलवादी आणि शंकर कोळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत या समस्यांवर तोडगा निघत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.