शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या घशाला कोरड का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:42 IST

एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

कल्याण : एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ओढवली आहे. पाणीटंचाईबाबत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी प्रशासन ठोस कार्यवाही करत नसल्याने स्थानिक नगरसेवकही नाराज झाले आहेत.फडके मैदान प्रभागातील साईबाबानगर, दुर्गानगर, महाराष्ट्रनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर या विभागांमध्ये महिना-दीड महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याअभावी बोअरिंग तसेच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण भरले आहे, मग आमच्या घशाला कोरड का, असा सवाल येथील रहिवाशांचा आहे.यासंदर्भात नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत, उगले यांना विचारले असता प्रभागांमधील बहुतांश भागांमध्ये पाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोहने उदंचन केंद्राच्या पंपात बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण पाणीपुरवठा विभागाकडून दिले जात आहे. पण, हे कारण पटणारे नाही. सध्या पाऊस पडत असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तीन महिने पाठपुरावा करूनही त्यांना दोष सापडत नाही, पण याचे खापर पंपिंगवर फोडतात, हा आमचा आरोप असल्याचे ते म्हणाले.यासंदर्भात केडीएमसीचे ‘क’ प्रभागाचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत सोनवणे म्हणाले, १० ते १२ दिवस पाणी सुरळीत येत नव्हते, परंतु आता दोष निकाली काढला आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा त्यांनी केला.बिर्ला कॉलेज प्रभागातही महिनाभरापासून पाणी येत नसल्याने तेथील रहिवाशांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे. स्थानिक नगरसेविका छाया वाघमारे याही पाणीटंचाईच्या तक्रारीने हैराण झाल्या आहेत.प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजूबाजूच्या प्रभागांना पुरेसे पाणी मिळत आहे, मग आमच्याच प्रभागाला सापत्न वागणूक का, असा सवाल त्यांनी केला आहे.