शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधीच पाण्यासाठी ओरड त्यात जलवाहीनीला गळती, पाणी पुरवठ्यावर परिणाम

By अजित मांडके | Updated: July 10, 2024 15:03 IST

पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ झाल्याने ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर ९ जुलै पासून परिणाम झाला आहे. ठाण्यात टप्याटप्याने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी टँकरचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

ठाणे :  भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, त्यात आता महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी टेमघर माजिवडा दरम्यान मुख्य जलवाहीनीला गळती सुरु झाली आहे. त्यामुळे ठाण्याला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर आणखी परिणाम झाल्याचे दिसून आले.

पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ झाल्याने ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर ९ जुलै पासून परिणाम झाला आहे. ठाण्यात टप्याटप्याने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी टँकरचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून येथील गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. ते काम आता अंतिम टप्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यानुसार ११ जुलैपर्यंत म्हणजेच गुरुवार पर्यंत पाणी पुरवठा अनियमित होईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. हे दुरुस्तीचे काम सुरु असतांनाच बुधवारी सकाळी ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाºया मुख्य जल वाहिनीमध्ये टेमघर-माजिवडा दरम्यान गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था बंद करण्यात आली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.

दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने सांगितले. परंतु ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान ही दुरुस्ती आणि पंपिंग स्टेशन मधील गाळ सफाई या कामामुळे गुरुवार, ११ जुलैपर्यंत पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.