शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाईला परवानगी द्या; ‘एसीबी’ने नगरविकास विभागाकडे मागितली दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:11 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या ७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारच्या नगरविकास विभागाकडे परवानगी मागितली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या ७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारच्या नगरविकास विभागाकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील अहवाल महापालिका आयुक्तांनी ‘नगरविकास’कडे पाठवलेला नाही. त्यामुळे हा अहवाल न पाठवल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाईची परवानगी दिली जाईल, अशी तंबीच नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिली आहे.बेकायदा बांधकामप्रकरणी २००४ मध्ये कौस्तुभ गोखले व श्रीनिवास घाणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आॅगस्ट २००६ मध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने बेकायदा बांधकामे झाल्यास प्रभाग अधिकाºयाला जबाबदार धरावे. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई झालेलीच नाही.२००६ च्या आदेशानंतर २०१७ पर्यंत १८ हजार बेकायदा बांधकामे झाली आहेत. या बांधकामांना महापालिकेने मालमत्ताकर लागू केला आहे. मात्र, कराच्या बिलांवर ‘बेकायदा बांधकाम’ असा शिक्काही मारला आहे. याचाच अर्थ बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. कर लागू केला असला, तरी त्या कारवाईस बाधा येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख असताना बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाई झालेली नाही.२०१७ मध्ये शीळफाटा येथील लकी कम्पाउंड ही बेकायदा इमारत पडली. त्यात अनेक जणांना प्राण गमवावे लागले. लकी कम्पाउंड प्रकरणात ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांविरोधात कारवाई झाली. तशा प्रकारची कारवाई कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेली नाही. महापालिका हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत. हा आकडा पाहता लकी कम्पाउंडच्या घटनेनंतर महापालिकेकडून अशा प्रकारची कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, ती झालेली नसल्याने घाणेकर यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’ने घाणेकर यांचा जबाब घेतला होता. त्यानंतर, या विभागाने नगरविकास विभागाकडे कारवाईसाठी परवानगी मागितली. मात्र, नगरविकास विभागाने महापालिकेकडे विचारणा करत दोषी अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याची सूचना केली होती. त्यानंतरही महापालिकेने बेकायदा बांधकाम प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाºयांची नावे पाठवली नाहीत. महापालिकेचा हा प्रतिसाद पाहता नगरविकास विभागाने महापालिकेस बजावले आहे की, नावे न कळवल्यास कारवाईसाठी परवानगी दिली जाईल.पत्रे देऊनही कारवाई नाहीमागच्या वर्षी अग्यार समितीने सादर केलेला बेकायदा बांधकाम प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. नगरविकास विभागाने तसे पत्रही महापालिका आयुक्तांना पाठवले होेत. त्यानंतरही आयुक्तांनी दोषींच्या विरोधात कारवाई केलेली नाही, याकडे याचिकाकर्ते घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका