शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालयाकडून नागरिकांना सनदचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2023 13:43 IST

माहिती अधिकार कार्यकर्ते मोती दुसेजा यांना बोगस गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार उघड होऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी चार जणांना अटक केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर : प्रांत कार्यालयाच्या वतीने जागेवर १९६२ पूर्वी पासून ताबा असणाऱ्या १० नागरिकांना जमीन मालकी हक्क (सनद) आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रांत अधिकारी विजय शर्मा यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगरातील नागरिकांना सनद मिळणे आणि सनद पडताळणी लवकरात करून देण्याबाबत आमदार  कुमार आयलानी यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांची भेट घेऊन मागणी केली होती. जयराज कारभारी यांनी (सनद) जमीन मालकी हक्कासाठी नागरिकांनी प्रांत कार्यालय यांच्याशी संपर्क करून कागदपत्राची पूर्तता करण्याचें आवाहन केले होते. विशिष्ट नमुन्यात नागरिकांनी अर्ज केल्यावर सादर केलेल्या कागदपत्राची पडताडणी करून जागेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. जे अर्ज नियमात बसतात अश्या नागरिकांना सनद जाहीर केल्या आहेत. बुधवारी एकून १० नागरिकांना सनदचे वाटप आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते झाले. सनद घोषित केल्यावर, शासन शुल्क नागरिकांनी भरल्यावर जागा त्यांच्या मालकीची होणार आहे. अशी माहिती यावेळी आयलानी यांनी दिली. प्रांत कार्यालयाकडे आलेल्या सनद अर्जाचा निपटारा केल्यास असंख्य जणांना जागेची मालकीहक्क मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 नवनियुक्त प्रांत अधिकारी विजय शर्मा यांनी सनद देण्याच्या कामाला गती देणार असल्याचे संकेत दिले. प्रांत कार्यालयात सनद घोटाळा गाजला असून बनावट सनद देण्यावरून नागरिकांनी व व्यापारी संघटनेने कार्यालयावर मोर्चा काढून चौकशीची मागणी केली होती. चौकशीत काही सनद जमावबंदी आयुक्तांनी रद्द करून इतर सनदची चौकशी सुरू आहे. कॅम्प नं-५ कुर्ला कॅम्प कैलास कॉणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या निवासीस्थान व खुल्या जागेवरील सनद, विठ्ठलवाडी पोलीस वसाहतीवरील सनद, कॅम्प नं-५ मासे बाजार येथील महापालिका शाळा मैदानावर दिलेली सनद, अनेक सामाजिक संस्थेच्या जागेवरील सनद आदी असंख्य दिलेल्या सनद वादात सापडल्या आहेत.

प्रांत कार्यालय व पोलीस अधिकारी टार्गेटवर? माहिती अधिकार कार्यकर्ते मोती दुसेजा यांना बोगस गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार उघड होऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी चार जणांना अटक केली. यामध्ये मध्यवर्ती पोलीस वादात सापडले असून प्रांत कार्यालयातील मोठे अधिकारी पोलिसांच्या टार्गेटवर आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर